सत्कारमूर्ती विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्याशी अनौपचारिक चर्चा
संमेलनात विदर्भ राज्य, ओबीसी जातानिहाय जनगणना व महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांच्या निषेध, आदी ठराव घ्यावेत
चंद्रपूर :गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर, सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच, चंद्रपूर द्वारा आयोजित विदर्भ साहित्य संघाचे स्व. मनोहरराव म्हैसाळकर स्मृती ६८वे विदर्भ साहित्य संमेलनाचे आज (दि.१६) ला स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात थाटात उद्घाटन झाले. OBC Leader Ashok Jivtode
या निमित्ताने काही विशेष व ज्येष्ठ मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात डॉ. अशोक श्रीहरी जीवतोडे (विदर्भवादी ओबीसी नेते) यांच्या शैक्षणिक, सामाजीक, सांस्कृतिक कार्याचा सत्कार राज्याचे सांस्कृतिक मंत्री मान. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. OBC Leader Ashok Jivtode
या निमित्ताने सत्कारानंतर अनौपचारिक चर्चे दरम्यान डॉ. अशोक जीवतोडे यांचेसह वार्तालाप करण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, ६८वे विदर्भ साहित्य संमेलनाचे निमित्ताने संमेलनात, 'स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे', करीता ठराव घेण्यात यावा. म्हणजे पुढले विदर्भ साहित्य संमेलन हे विदर्भ राज्यातच होईल, या करीता राज्य शासनास ठराव पाठवून पाठपुरावा करावा. सोबतच विदर्भात ६०% ओबीसी समाज आहे. ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात साहित्यिक आहेत. या ओबीसी समाजाचे उत्थान व्हावे, त्यांचे संवैधानिक, न्याय हक्क व अधिकार त्यांना मिळावेत, या करीता ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना व्हावी, याकरीताही या संमेलनात मंथन व्हावे, तथा ठराव पारीत करावा. सोबतच सध्या राज्यात व देशात संवैधानिक व राजकीय पदावर असलेले अनेक जण राज्यातील व देशातील थोर-महात्म्या विरोधात चुकीचे व दिशाभूल करणारे वक्तव्य करतात. अशा समाजविघातक प्रवृत्ती व विचारांविरोधात संमेलनात मंथन व्हावे. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांच्या निषेध ठराव घेण्यात यावा.
OBC Leader Ashok Jivtode |
Live from Vidarbha Sahitya Sammelan
डॉ. अशोक जीवतोडे हे विदर्भ राज्य पुरस्कर्ते व ओबीसी चळवळीतील अग्रणी आहेत. त्यांनी मागील अनेक वर्षांपासून या चळवळीच्या माध्यमातून विदर्भ व ओबीसी प्रश्नांवर आवाज बुलंद केलेला आहे, हे विशेष.