चंद्रपूर मनपा " शहर स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धा "
Chandrapur Municipal Corporation "City Cleanliness and Beautification League Competition"
चंद्रपूर १५ डिसेंबर - चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आयोजीत " स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धेत योग नृत्य परिवार आझाद गार्डन संघास १ लक्ष रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले असुन सोमवार दि. १२ डिसेंबर रोजी फेसबुक लाईव्ह (Facebook Live) कार्यक्रमाद्वारे विजेत्यांची घोषणा आयुक्त विपीन पालीवाल यांनी केली.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोकसहभागातुन १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत " माझ्या शहरासाठी माझे योगदान " या थीमवर ही वार्डस्तरीय स्पर्धा चंद्रपूर मनपातर्फे घेण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे ट्रॉफी व ज्या वार्डातील संघ सहभागी आहेत त्या वॉर्डांस विकास व सौंदर्यीकरणाची कामे करण्यास विशेष निधी दिला जाणार होता.
या स्पर्धेत लोकप्रतिनिधी,स्वयंसेवी, सामाजीक संस्था,युवक/युवती मंडळे इत्यादींनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला. स्पर्धेतील निकषांनुसार त्रयस्थ निरीक्षकांद्वारे स्पर्धेचे निरीक्षण करण्यात आले व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन विजेते घोषित करण्यात आले.
त्यानुसार योग नृत्य परिवार आझाद गार्डन संघास प्रथम पारितोषिक – १ लक्ष, ट्रॉफी व वार्डासाठी २५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे, योग नृत्य परिवार राजीव गांधी गार्डन संघास द्वितीय पारितोषिक – ७१ हजार,ट्रॉफी व त्या वार्डासाठी १५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संघास तृतीय पारितोषिक – ५१ हजार, ट्रॉफी व त्या वार्डासाठी १० लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे तर चंद्रपूर बचाव संघर्ष समिती संघास प्रोत्साहनपर बक्षीस म्हणुन – ३१ हजार, ट्रॉफी व त्या वार्डासाठी ५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे या स्वरूपाची बक्षीस घोषित झाली आहेत.
याशिवाय उत्कृष्ट कार्य करणारे गट जसे - राग आय अप सायकलींग संघ यांना टाकाऊपासुन टिकाऊ वस्तु बनविण्यास २१ हजार व ट्रॉफी, ज्येष्ठ नागरीकांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ज्येष्ठ नागरीक संघ महेश नगर यांना - २१ हजार व ट्रॉफी तसेच राजीव गांधी उद्यान पतंजली योग्य समितीस - २१ हजार व ट्रॉफी, कचरा टाकण्याच्या जागेचे सौंदर्यीकरण केल्याबद्दल योग नृत्य परिवार संजय नगर यांना - २१ हजार व ट्रॉफी, ऐतिहासिक धरोहर परिसराची स्वच्छता केल्याबद्दल वानर सेना मित्र परिवार यांना - २१ हजार व ट्रॉफी,नाविन्यपुर्ण आणि सुयोग्य स्वच्छता उपक्रमाबाबत साईबाबा मित्र परिवार यांना - २१ हजार व ट्रॉफी तर कचऱ्याचा सुयोग्य वापर होम कंपोस्टींगद्वारे केल्याबद्दल डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्वच्छता मंडळ तुकूम या संघाला - २१ हजार व ट्रॉफी स्वरूपाची पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.
आयुक्त विपीन पालीवाल यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले असून लवकरच एका कार्यक्रमांतर्गत सर्व विजेत्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत. या प्रसंगी डॉ. अमोल शेळके, संतोष गर्गेलवार,साक्षी कार्लेकर उपस्थीत होते.