Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर १५, २०२२

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर रेल्वेमंत्र्यांना भेटले; चंद्रपूरसाठी केली या रेल्वेची मागणी | Congress MP Balu Dhanorkar met Railway Minister Ashwini Vaishnav

 रेल्वे संदर्भातील विविध मागण्यांना घेऊन काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर रेल्वेमंत्र्यांना भेटले 


MP Balu Dhanorkar |  Railway Minister Ashwini Vaishnav

चंद्रपूर । लोकसभा मतदारसंघातील रेल्वे संदर्भातील विविध समस्यांना घेऊन काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. नवी दिल्लीत झालेल्या या भेटीदरम्यान त्यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विविध रेल्वेच्या संदर्भातील समस्यांचे निवेदन सादर केले. 


रेल्वे संदर्भातील विविध मागण्यांना घेऊन काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर रेल्वेमंत्र्यांना भेटले 

 रेल्वे विषयक विविध समस्यांसाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद 

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे संदर्भातील विविध समस्यांना घेऊन काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. नवी दिल्लीत झालेल्या या भेटीदरम्यान त्यांनी चंद्रपूर, यवतमाळ व गडचिरोली जिल्ह्यातील विविध रेल्वेच्या संदर्भातील समस्यांचे निवेदन दिले. यावेळी रेल्वे विषयक विविध समस्यांसाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित मार्गी काढण्याचे आश्वासन खासदार बाळू धानोरकर यांना दिले.   

चंद्रपूर लोकसभा क्षेत्राला तेलंगणा राज्याची सीमा लागून आहे. या भागात राजुरा, गडचांदूर क्षेत्र मागील अनेक दिवसांपासून समस्यांनी ग्रस्त आहे. तालुक्यातील अल्ट्राटेक आणि माणिकगड अंबुजा सिमेंट उद्योगांसाठी दिल्ली चेन्नई रेल्वे मार्गवर चुनाळा, राजुरा, अवरपुर पर्यंत रेल्वे लाईन निर्माण सत्तावीस वर्षांपूर्वी झाली होती. त्या मार्गावर केवळ कोळसा आणि सिमेंट वाहतूक करण्यात येते. या मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, ती मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही, याकडे देखील खासदार बाळू धानोरकर यांनी लक्ष वेधले. 


बल्लारपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे सुविधा आहेत. मात्र, 50 ते 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या या खेडेगावातील आणि औद्योगिक क्षेत्रातील नागरिकांना पायपीट करावी लागते. गडचांदूर रेल्वे स्थानक व मार्ग कर्मचारी उपलब्ध आहेत. गडचांदूर, आदीलाबाद रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. गडचांदूर ते चुनाळा रेल्वे सुरू करण्यासाठी कारवाई करण्याची मागणी यावेळी केली. 


या निवेदनात काझीपेठ - पुणे एक्स्प्रेस आठवड्यातून तिन दिवस सुरु करणे, बल्लारपूर- भुसावळ सेवाग्राम लिंक एक्स्प्रेस (५११९६) पूर्ववत सुरु करणे, नागपूर - मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस, बल्लारपूर जबलपूर व्हाया नागभीड इंटरसिटी एक्प्रेस, बल्लारपूर - मूल- नागभीड- ब्रम्हपुरी- गोंदिया रेल्वे मार्गावरील अंडरपास पावसाळ्यात शेतकऱ्यांना आवागमन करण्यास त्रासदायक ठरतात. त्याबाबत कायम स्वरूपी उपाययोजना करणे, राजुरा - असिफाबाद- हैद्राबात मार्गावर रेल्वे गेट नं. LC No 3.0H व विरून स्टेशन महाराष्ट्र पोल नं. 159/17 जवळ अंडरपास तयार करणे, गडचांदूर चुनाळा वरून नागपूर शटल रेल्वे सुरु करणे, भांदक रेल्वे स्टेशन वर 

1. दक्षिण एक्सप्रेस ट्रेन नं. 12721 / 12722, 2. मद्रास जम्मुतवी एक्सप्रेस ट्रेन नं. 16031/16032, 3. मद्रास लखनी एक्सप्रेस ट्रेन नं. 18093/ 16094, 4. मद्रास जोधपूर एक्सप्रेस ट्रेन नं. 22663 / 22664, 5. दानापूर सिकंदराबाद एक्सप्रेस ट्रेन नं. 12791/12792, 6. पेरणाकुलम पटणा एक्सप्रेस ट्रेन नं. 16359, 7. नवजिवन एक्सप्रेस ट्रेन नं 12656 / 12657, 8. अँड ट्रक एक्सप्रेस ट्रेन नं. 12615/12616, 9. हिसार एक्सप्रेस ट्रेन नं. 22737 या 1 ते 9 गाडयांना स्टॉपेज देणे. 


महाराष्ट्र राज्यातील विदर्भ क्षेत्रात येणारा चंद्रपूर- गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहूल आहे. नक्षल प्रभावित असल्याने विकासाची कामे पाहिजे, तशी होऊ शकत नाहीत. येथे राज्य परिवहन सेवेची बस सेवा चालते. मात्र, राज्य परिवहन मंडळ नेहमीच तोट्यात असतो. ग्रामीण आणि शहरी भागातील सुविधा सुरू करण्यासाठी गो राऊंड ट्रेन मध्य रेल्वेने बल्लारपूर स्टेशन येथून सुरू करून चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, हिंगणघाट, सेवाग्राम, नागपूर, भंडारा, गोंदिया, वडसा, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, चंद्रपूर - बल्लारशा अशी सुरू करण्याची मागणी खासदारांनी केली. 


दक्षिण पूर्व मध्य रेल्वे द्वारा जबलपूर ते चंद्रपूर नवीन गाडी सुरू झाली आहे. ही गाडी चंद्रपूर ऐवजी बल्लारपूरपर्यंत (02274-02273) सुरू झाल्यास बल्लारपूर, राजुरा, गडचांदूर येथील प्रवाशांना लाभ होऊ शकतो. त्यामुळे महसुलात देखील मोठी वाढ होऊ शकते. अंबुजा सिमेंट, अल्ट्राटेक, माणिकगड आदी उद्योग येथे मोठ्या प्रमाणात आहेत. ही गाडी सौंदळ, अर्जुनी, वडसा, नागभीड, मुल आणि मारोडा या स्थानकावर थांबल्यास अनेक प्रवाशांना त्याचा लाभ होऊ शकतो. याकडेदेखील मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.


Chandrapur | Congress MP Balu Dhanorkar met Railway Minister Ashwini Vaishnav regarding various issues related to railways in the Lok Sabha constituency. During this visit in New Delhi, he presented a statement regarding various railway related problems in Chandrapur and Gadchiroli districts.

Chandrapur-Gadchiroli district in the Vidarbha region of Maharashtra state is tribal-rich. Due to Naxal influence, the development work cannot be done as it should be. Bus service of State Transport Service operates here. However, State Transport Board is always in loss. Demand to start Go Round train from Ballarpur station by Central Railway to start facilities in rural and urban areas and start from Chandrapur, Bhadravati, Warora, Hinganghat, Sevagram, Nagpur, Bhandara, Gondia, Vadsa, Brahmapuri, Nagbhid, Sindewahi, Mul, Chandrapur - Ballarsha MPs did.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.