Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, डिसेंबर १६, २०२२

ट्रक चालकांसाठी शिबिर; आयुष्यमान कार्डसह विविध योजनांचा लाभ | truck drivers

अल्ट्राटेक सिमेंट लॉजीस्टीक विभाग आवाळपुर व निहाल जनसेवा केंद्र नांदा फाटा यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रक चालकांसाठी शिबिर आयोजित


प्रतिनिधी : अल्ट्राटेक वाहन चालक प्रशिक्षण कार्यालय आवाळपुर येथे अल्ट्राटेक सिमेंट लॉजीस्टीक विभाग व निहाल जनसेवा केंद्र नांदा फाटा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ट्रक पार्किंग विभागातील वाहन चालकांनसाठी ईश्रम कार्ड, आभा कार्ड, आधार कार्ड,वाहन विमा, आरोग्य विमा, आयुष्यमान कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या वेळी त्यांना सुधारित आधार नोंदणी,वाहन विमा, श्रम योगी मानधन योजना, अपघात विमा व विविध योजने संदर्भात वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यात आले.


निहाल जनसेवा केंद्र नांदा फाटा चे संचालक हबिब शेख यांनी ट्रक चालक यांना आधार कार्ड,ईश्रम कार्ड,वाहनांचे बिमा , आयुष्यमान हेल्थ कार्ड काढून दिले . या उपक्रमाचा लाभ १५० वाहन चालकांनी घेतला.

सतत कामानिमित्त कायमस्वरूपी घरापासून व आपल्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या वाहन चालकांना कागदपत्रे काढण्याकडे दुर्लक्ष होत असते. त्या शिवाय माल भरणे व उतरवणे,दिवस रात्र वाहन चालविणे यांमुळे वाहन चालकांना वेळ मिळत नसल्याने . ही बाब लक्षात घेऊन अल्ट्राटेक सिमेंट लॉजीस्टीक विभाग तर्फे वाहन चालकांसाठी हे शिबिर घेण्यात आले.


या शिबिरासाठी अल्ट्राटेक सिमेंट लॉजीस्टीक विभागाचे मुख्य अधिकारी चंद्रशेखर पांडे, रविकिरण पांडे, देवेंद्र शर्मा, नितीन व्यास,आनंद विशरोजवार, सोमनाथ चौधरी,मनोज राउत,मोहन देशमुख,संदिप चौधरी ,अमोल गुजर,सुहास पाटील,सुधीर टोगे, मोहम्मद एजाज,चंदरपालजी शर्मा, संतोष रोकमवार यांनी मेहनत घेतली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.