#अखंड नामसकीर्तन सोहळा
# हजारो प्रेक्षकांची कार्यक्रमाला उपस्थिती
गजेंद्र डोंगरे/
कोंढाळी : श्री विठ्ठल रुख्मिणी संच प्रस्तुती शेगावचा राणा श्री संत गजानन महाराज अगाध लीला नाट्य प्रयोगातून गजानन महाराज अवतऱ्यालाची प्रत्यक्ष अनुभूती गुरुवारला रात्रीचे कार्यक्रमातून हजारो प्रेक्षकांनी अनुभवली. श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थान कोंढाळी येथे 28 वा अखंड नामसंकीर्तन महोत्सव दि 14 ते 21 दरम्यान आयोजिला आहे. यात मध्ये विविध धार्मिक,सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माधवबाग हॉस्पिटल यांचे वतीने शुक्रवार दि 16 ला रोग निदान शिबीर पार पडले. सायंकाळी हभप कैलास चव्हाण महाराज मुबंई यांचे कीर्तनाचा भक्तांनी लाभ घेतला. पंक्रोशीतील भव्य श्री माऊली पालखी सोहळा सोमवार दि 19 ला आयोजिल असून नामवंत कलापथक, दिंड्या,देखावे वाद्य पथक सामील होत आहे.शनिवारला शिव चरित्र युवाकीर्तन कार किरण शिंदे आळंदी यांचे कीर्तन तर रविवार रात्री व सोमवारला दुपारी समारोपीय कीर्तन हभप विशाल बडे महाराज दारव्हा झी टाकीज कीर्तनकार यांचे उपस्थितीत होत आहे. त्यानंतर महाप्रसाद होणार असल्याची माहिती आयोजन समितीने दिली.
-
श्री विठ्ठल रुख्मिणी कलाकारांचे उत्कृष्ठ भूमिका....
श्री गजानन महाराज उत्कृष्ठ भूमिका धीरज तिजारे पुणे,बंकटलाला विशाल डांगोरे,पितांबर महेश येवले,गणेश श्रीखंडे,वैभव तिजारे,निखिल भक्ते,सुरज गुळानदे ,हितेश बोडखे,उपेश भेलकर, महेश तिजारे, राहुल डांगोरे,मोहित चोपडे,तुषार श्रीखंडे,सर्व परादसिंगा,यशश्री थुल,शिवानी सहारे नागपूर,बाल कलाकार पृथ्वी डांगोरे,मांगल्य तिजारे,हार्दीक भेलकर,बेलसरे आदींसह कलाकारांचा सहभाग होता.उत्कृष्ठ रंगमंच व्यवस्थापन प्रवीण येवले,मेकअप प्रशांत खडसे नागपूर,व्हिडीओ व फोटोग्राफी गजेंद्र डोंगरे कोंढाळी,साऊंड टुलेश्वर सोनकुसळे बेनोडा, लायटींग इफेक्टस अनिल भालेराव नागपूर आदींनी जबाबदारी पार पाडली.