नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. २०२२ या वर्षात अनेक घटना घडल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील २०२२ या वर्षातील महत्वाच्या घडामोडींचा आढावा .
साल 2022 की मुख्य घटनाओ पर एक नजर
चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष human wildlife conflict नवीन नाही. मागील अनेक वर्षांपासून वाघांच्या वाढत्या संख्येमुळे मानवी वस्तीत हस्तक्षेप होऊन अनेक जणांचे बळी गेले. हजारो जनावरे मारले गेलेत. वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी उपाय योजना आखत असताना या वर्षभरामध्ये 60 जणांचा बळी गेला. इतकेच नव्हे तर रेल्वे अपघात आणि नैसर्गिक मृत्यू, याशिवाय वाघांच्या झुंजीमध्ये देखील जवळपास दहा ते बारा वाघांचा मृत्यू झाला. अनेक अपघाताच्या घटनांमध्ये वन्यजीव देखील मृत्युमुखी पडले आहेत.
चंद्रपूर Chandrapur जिल्ह्यात गुढीपाडव्याच्या दिवशी एक खगोलीय isro घटना घडली. जी बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. चंद्रपूर जिल्ह्याच्या आकाशातून एक आगीचा गोळा असलेली वस्तू Metal Balloon जाताना दिसली. ती सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी व पवनपार येथे कोसळल्या. आकाशातून पडलेली धातूची रिंग ( Satellite) आणि दोन मोठ्या गोलाकार वस्तू सापडल्या. त्यानंतर ताडोबा आणि आसोला मेंढा जंगलात देखील या गोलाकार वस्तू आढळल्या. चंद्रपूर जिल्ह्यात घुगुस येथे आमराई वार्डामध्ये मागील चार-पाच महिन्याआधी एक घर भूस्खलन होऊन जमिनीखाली गाडल्या गेले. आज ज्या ठिकाणी वसाहत आहे, तिथे पूर्वी भूमिगत कोळसा खाण होती. या घटनेची जखम कायम असताना चंद्रपूर शहरातील घुटकाळा वार्डात एक राहते घर कोसळले. ( Satellite)
बल्लारपूर Ballarpur येथील रेल्वेचे पादचारी ओव्हर ब्रिज कोसळले. Chandrapur Ballarpur Slab Collapce यात एक महिला ठार झाली. या घटनेमध्ये जवळपास 11 ते 12 जण गंभीरित्या जखमी झाले होते.
याशिवाय जिल्ह्यामध्ये अपघाताच्या मोठ्या प्रमाणात घटना घडलेल्या आहेत. यामध्ये अडीचशे हुन अधिक दुचाकी चालकांचा देखील मृत्यू झालेला आहे. गुन्हेगारी विश्वामध्ये ही चंद्रपूर मागे पडले नाही. अनेक खुनाच्या - मारहाणीच्या आणि चोरीच्या घटना या वर्षभरात उघडकीस आल्या.
Latest Chandrapur News in Marathi | Chandrapur Local News | Chandrapur Local News Updates | ताज्या बातम्या
लोक हेदेखील विचारतात | Bridge Collapse chandrapur chandrapur news ballarpur Maharashtra News Slab Collapse