विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर येथे शेतीच्या वादातून पुतण्याने काकाची हत्या (खून/ Murder) केली.
नगर परिषद क्षेत्रातील गांधी वार्ड मधील रहिवासी ५८ वर्षीय प्रभाकर नागोसे (मास्तर) यांचे आपसी शेतीच्या वादातून पुतन्यासोबत भांडण झाले. या वादात पुतन्या रुपेश पत्रु नागोसे याने प्रभाकर नागोसे याच्या डोक्यावर लाठीकाठीने वार केले. वार केल्याने प्रभाकर यांचा घटनास्थळीच मृत्यू (Murder) झाला.
घटनेची वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकी मृतकाच्या पत्नीला देण्यात आली. तक्रार प्राप्त होताच चिमूर पोलिसांनी आरोपी रुपेश पत्रु नागोसे याला अटक केली आहे. पुढील तपास चिमूर पोलिस (Chimur Police station) करीत आहेत.
शेतीच्या वादातून पुतण्याने केली काकाची हत्त्या
चिमूर येथील गांधी वार्ड येथे दिनांक 27 डिसेंबरला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान शेतीच्या वादातून रागाच्या भरात पुतण्याने काकावर जीवघेणा हल्ला केला.28 डिसेंबरला मध्यरात्री उपचारादरम्यान काकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. आरोपी पुतण्याला चिमूर पोलिसांनी अटक केली आहे. खुनाच्या या घटनेने चिमूर शहरात खळबळ निर्माण झाली आहे. मृतक काकाचे नाव प्रभाकर धर्माजी नागोसे ( वय – 60 वर्ष ) तर अटक झालेल्या आरोपी पुतण्याचे नाव रुपेश पत्रू नागोसे ( वय – 39, रा. गांधी वॉर्ड चिमूर, हल्ली मुक्काम बुट्टीबोरी, जि. नागपूर ) आहे.
चिमूर पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मृतक प्रभाकर धर्माजी नागोसे व आरोपी रुपेश पत्रू नागोसे हे नात्याने एकमेकांचे चुलते – पुतने आहेत. मृतकाने आपल्या आई-वडीलांचा मरेपर्यंत सांभाळ केल्यामुळे त्यांच्या वडीलाने सहा मुलांना शेतीचा समान हिस्सा देऊन स्वतःकरीता एक हिस्सा ठेवला होता. वडील मरण पावल्यानंतर त्यांचा हिस्सा मृतकाने स्वतः ठेवून घेतला. तसेच मृतकास कोणतेही अपत्य नसतांना तो प्लॉट विक्रीचा व्यवसाय करुन दोन वर्षांपूर्वी नविन घर बांधून प्रगती करीत होता. याचा रुपेशला राग होता.
#truecrimecommunity #mystery #killer #serialkiller #death #truecrimepodcast #podcast #truecrimeaddict #serialkillers
घटनेच्या दिवशी ( दिनांक २७/१२/२०२२ ) दुपारी तीन वा.च्या सुमारास आरोपी रुपेश हा कामावर असलेल्या बुट्टीबोरी, नागपूर येथून मृतकास नुकसान पोहचविण्याचे उद्देशाने चिमूर येथे घरी आला. परंतु प्रभाकर हा घरी हजर मिळून न आल्याने त्याने प्रथम प्रभाकरच्या पत्नीशी झगडा-भांडण केले. काही वेळात प्रभाकर हा रस्त्याने घराकडे येतांना दिसताच रुपेशने प्रभाकरच्या घरात शिरुन लाकडी स्टुल फरशीवर आदळून तोडला व स्टुलच्या पायाचा दांडा घेऊन रस्त्यावर आला.प्रभाकर घरात प्रवेश करण्याच्या आधीच घराजवळील रस्त्यावरच रुपेशने प्रभाकरच्या डोक्यावर स्टुलच्या पायाच्या दांडयाने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. तसेच मृतकाच्या पत्नीला कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. घटनास्थळावरील रक्ताच्या डागावर पाणी टाकले व पुरावा नष्ट केला, अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून व उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथुन प्राप्त झालेल्या ब्रॉड डेथ मेमो वरुन सदरचा गुन्हा चिमूर पोलिसांनी नोंद करुन तपासात घेतला.
#creepy #murdermystery #scary #love #truecrimejunkie #police #murderer #thriller #art #blood #halloween #justice #murderino #unsolved #homicide #history #criminal
सदर गुन्ह्याच्या घटनास्थळास उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर, पोलीस निरीक्षक मनोज गभने या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली.शासकीय पंचाना पाचारण करुन पंचासमक्ष घटनास्थळ पंचनामा नोंदविण्यात आला. शवविच्छेदन करुन मृतकाचे प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
मृतकाच्या मृत्युसंबंधाने वैद्यकिय अधिकारी यांचेशी सविस्तर चर्चा करण्यात आली. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
#murder #truecrime #crime #horror #truecrimecommunity #mystery #killer #serialkiller #death #truecrimepodcast #podcast #truecrimeaddict #serialkillers #creepy #murdermystery #scary #love #truecrimejunkie #police #murderer #thriller #art #blood #halloween #justice #murderino #unsolved #homicide #history #criminal