अजगर सापास पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली; वाहतुकीची कोंडी
सर्पमित्र बंडू धोतरे यांनी केले रेस्क्यू
चंद्रपूर शहरातील जटपुरा गेटकडून रामाळा तलावकड़े जाणाऱ्या रस्त्यावर भला मोठा अजगर साप दिसून आल्याने परिसरातील नागरिक आणि रस्त्याने ये-जा करणारे नागरिकांची आणि त्यांच्या वाहनांची एकच गर्दी झाली. अजगर साप पाहण्यासाठी तोबा गर्दी उसळली होती. आज २८ डिसेंबर रोजी रात्री 09:00 वाजता दरम्यान ही घटना घडली.
साप असल्याची बाब दिसताच काही नागरिकांनी इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांना माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र बंडू धोतरे घटनास्थली पोहचले. परिस्थिति लक्षत घेत तत्काल रेस्क्यू सुरु केले. अजगर जातीचा साप रामाला तलाव रोडवर निघाल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
In Chandrapur, there is a very large seven feet python on the road
रामाळा तलाव वाहतुकीचा मार्ग बंद पडला. जवळपास सहा ते सात फूट लांबीचा अजगर असून, त्याचे वजन जवळपास ९- १० किलो आहे आणि तो रामाला तलाव लगत असणाऱ्या किल्ल्याच्या भिंतीस वरच्या भागात होता. एवढा भला मोठा साप या ठिकाणी दिसून आल्याने नागरिकांची मोठी गर्दी झाली. बंडू धोत्रे यांनी त्वरित शिताफीने त्या अजगर सापास पकडून रेस्क्यू केले. त्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली असून, निसर्गमुक्त करण्यात येणार आहे.