Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर २४, २०२२

यंदा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रतिष्ठेचा जीवा महाला पुरस्कार | Sudhir mungntiwar





मार्गशीष शुद्ध सप्तमी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. यावर्षी महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने प्रतापगढावरील अफजलखानाच्या थडग्याभोवती झालेले अतिक्रमण भुईसपाट केले. यामध्ये मोलाची भूमिका निभावणारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रतिष्ठेचा जीवा महाला पुरस्कार दिला जाणार आहे, अशी माहिती पुरस्कार संयोजन समितीचे अध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यांनी दिली. 

या पुरस्कारात सत्कारात सोन्याचे कडे भेट दिले जाणार आहे . शिवप्रताप दिन म्हणजे मार्गशीष शुद्ध सप्तमी ३० नोव्हेंबरला पुण्यातील सरस्वती मंदिर मैदान नातू पार्क येथे हा कार्यक्रम होणार आहे. 


वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांचा आंतरराष्ट्रीय आययुसीएन संस्थेकडून सत्कार 


 वनवैभव वाचविण्यासाठी आणि वनांच्या संवधर्नासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या IUCN (international union conservation of nation) संस्थेच्या वतीने वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी IUCN चे मुख्य अर्चना चटर्जी (नवी दिल्ली) व वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 


चंद्रपूर येथिल मूल रोड स्थित "वन अकादमी" येथे या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दि. २३ रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमात सामाजिक वनीकरण च्या सुनिता सिंग, वनअकादमी चे संचालक श्रीनिवास रेड्डी,  शैलेश टेभुर्णीकर यांची मंचावर उपस्थिती होती. 


यावेळी शैलेश टेभुर्णीकर यांनी IUCN च्या कार्याची माहिती दिली. जगामध्ये वाढलेले प्रदुषण व पर्यावरण रक्षणासाठी ही संस्था कार्यरत आहे. सामान्य जनतेला प्रत्येक वृक्षांचे फायदे व औषधीस उपयोगी असल्याची माहिती क्युआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून, "चंद्रमा" या ॲपचे उद्घाटन करण्यात आले. चंद्रमा या अॅपद्वारे प्रत्येक वनवृक्षाचे महत्व व त्यांची उपयुक्तता यांची माहिती त्या वृक्षावर लावलेल्या क्युआर कोडद्वारे मिळणार आहे.


वनसंपदेचा ऱ्हास होत असून पर्यावरण बिघडत चालले आहे. याकडे गांभिर्याने दखल देऊन वृक्ष लागवड मोहीमेची संकल्पना मंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी रुजविली. आज त्यांनी सुरु केलेल्या वृक्ष लागवड मोहिमेमुळे जंगलाचे प्रमाण वाढू लागले आहे. 


यापूर्वी राज्यात राबवलेल्या विविध विकास कार्यातून सामान्य, गरीब व गरजू नागरिकांना मोठा फायदा करून दिल्याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांना ‘द सीएसआर जर्नल’तर्फे समाजकार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.


पाच लोककल्याणकारी अर्थसंकल्प, तीन वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीचा निर्धार अशा विविध कामांची दखल घेत दिल्लीतील विज्ञान भवनात एका नियतकालिकातर्फे सुधीर मुनगंटीवार यांना सर्वश्रेष्ठ अनुभवी मंत्री म्हणूनही गौरविण्यात आले.


तसेच, मग्ना प्रकाशन संस्था व होथुर फाउंडेशन यांच्या वतीनं सोसायटी एक्सलेन्स पुरस्कार, लोकमत मीडियाच्या वतीनं प्रभाव राजकारणी म्हणून महाराष्ट्रीयन ऑफ दि ईअर पुरस्कार, वित्त मंत्री असताना मंत्री कार्यालयाला आयएसओ मानांकन देखील प्राप्त झाले होते. 


संबंधित शोध



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.