गडचिरोली (प्रतिनिधी)-
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने ७३ व्या व्यसनमुक्ती सप्ताहाचे भव्य आयोजन गडचिरोली जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभाग अंतर्गत समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखेच्या वतीने या सप्ताहाचे आयोजन
करण्यात आले आहे . नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष
उदय धकाते आणि जिल्हा सरचिटणीस संदिप कटकुरवार यांनी संपूर्ण नियोजन केले असून दि. १ ऑक्टोबर रोजी व्यसन विरोधी जागर पदयात्रा व व्यसनमुक्ती सप्ताह व व्यसन विरोधी पोस्टर प्रदर्शनी चे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन साखरा येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेत होईल.पंचायत समिती चे माजी सभापती मारोतराव इचोडकर, माजी उपसभापती विलासराव दशमुखे , सरपंच पुण्यवान सोरते, प्रमुख अतिथी मिना दिवटे , उपसरपंच अर्चना बोरकुटे, पोलिस पाटील वामनराव भानारकर, तंमुस अध्यक्ष मोरेश्वर गायकवाड, यशवंत चौधरी,शाळा समिती अध्यक्ष नुतनताई भैसारे, ग्रामसेवक जिल्लापेल्लि, मुख्याध्यापिका श्रीमती पिंपळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल. दि. २ ऑक्टोबर रोजी गुरुदेव उच्च प्राथमिक विद्यालयात सर्वधर्म प्रार्थना व व्यसन विरोधी शपथ देण्यात येईल. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अर्चना जनगणवार उपस्थित राहणार आहे.
दि. ३ऑक्टोबर रोजी सकाळी व्यसन विरोधी युवकाची कार्यशाळा व व्यसन विरोधी पोस्टर प्रदर्शनी शिवाजी महाविद्यालयात लावण्यात येणार आहे. याप्रसंगी तंबाखू व मघपानामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.अध्यक्ष म्हणून प्राचार्य डाॅ.एम.जे.मेश्राम शिवाजी महाविद्यालय तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम , समुपदेशक दिनेश खोरवडे, रामनगर गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सुरेश मांडवगडे उपस्थित राहणार आहे. दि. ४ ऑक्टोबर रोजी व्यसन आणि महिला सक्षमीकरण या कार्यक्रमांतर्गत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांमुळे महिलाच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयावर गडचिरोली महिला महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी पोलीस सहनिरीक्षक पुनम गोरे, प्राचार्य डाॅ.योगेश पाटील, मा.डाॅ.प्रा.सविता साधमवार , जिल्हा सामान्य रुग्णालयाचे मिना दिवटे मार्गदर्शन करणार आहे. दि. ६ ऑक्टोंबर रोजी दुपारी व्यसन विरोधी प्रबोधनपर युवकाची कार्यशाळा स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज मध्ये आयोजित केलेली आहे. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते सतिश चिचघरे राहतील. ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , प्राचार्य संगीता अतकमवार यावेळी मार्गदर्शन करणार आहे.
दि. ७ऑक्टो. रोजी दुपारी व्यसन विरोधी युवकाची कार्यशाळा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयावर आयोजित करण्यात आली आहे. फुले -आंबेडकर काॅलेज ऑफ सोशल वर्क होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डाॅ. खंगार राहणार आहे. ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , कवी चेतन ठाकरे, समुपदेशक दिनेश खोरगडे याप्रसंगी मार्गदर्शन करतील.८ ऑक्टो. रोजी सकाळी व्यसनमुक्ती सप्ताहाची सांगता रामनगर येथील जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळेत होणार आहे . अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर गोहणे राहतील तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक दिलीप मेश्राम, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पंडित पुडके, केशवराव दशमुखे गुरुजी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. या सर्व सप्ताहातील कार्यक्रमाचा लाभ जिल्ह्यातील जनतेने घ्यावा असे आवाहन सरचिटणीस संदीप कटकुरवार यांनी केले आहे.