seventy-years-old-building-collasped-ghutkala-ward-in-chandrapur
डोळ्या देखत कोसळली 60 ते 70 वर्ष जुनी इमारत
चंद्रपूर शहरातील घुटकाळा परिसरातील घटना... तीन तास एक महिला या इमारतीच्या मलब्याखाली दबून होती.मात्र तिला सुरक्षित काढण्यात यश आले.
शहरातील घुटकाळा वार्ड परिसरात असलेल्या तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील एका गल्लीत ७० वर्षीय जुनी तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये शबाना खान नामक महिला दबल्या गेली. पुंडलिक पाटील नामक व्यक्तीची ही इमारत असून ७० ते ८० वर्ष जुनी तीन मजली इमारत होती. या इमारतीत शबाना खान या एकट्याच राहत होत्या.
चंद्रपूर शहरातील घुटकाला प्रभागात आज अचानक 3 मजली इमारत पडल्याने परिसर हादरून गेला. सदर इमारत ही पुंडलिक पाटील यांच्या मालकीची असुन ती तब्बल 60 ते 70 वर्ष जुनी इमारत होती. मागील 2 दिवसापासून ती इमारत हलत असल्याने तिथे राहत असलेले भाडेकरू यांनी घर खाली केले होते.
आज 2 भाडेकरू घर खाली करीत होते, त्यावेळी शहिस्ता खान नामक महिला इमारतीच्या आत गेली त्यावेळी ती इमारत कोसळली. इमारतीच्या मलब्याखाली ती महिला तब्बल 3 तास बाहेर पडण्याचा संघर्ष करीत होती. प्रशासनाने तात्काळ बचाव कार्य सुरू केल्याने महिलेचा जीव वाचला.
सदर इमारत पडण्याचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.