महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलं आहे. एकीकडे राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांची सुनावणी सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना दुसरीकडे ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाबाबत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आल्यानं येत्या काही काळात निवडणूक जाहीर होणार आहेत.
जिल्हानिहाय आरक्षण
- ठाणे : सर्वसाधारण
- पालघर : अनुसूचित जमाती
- रायगड : सर्वसाधारण
- रत्नागिरी :नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- सिंधुदुर्ग : सर्वसाधारण
- नाशिक : सर्वसाधारण (महिला)
- धुळे : सर्वसाधारण (महिला)
- जळगाव : सर्वसाधारण
- अहमदगर :अनुसूचित जमाती
- नंदुरबार : अनुसूचित जमाती (महिला)
- पुणे : सर्वसाधारण
- सोलापूर :नागरिकांचा मागास प्रवर्ग
- सातारा : नागरिकांचा मागस प्रवर्ग (महिला)
- सांगली :सर्वसाधारण (महिला)
- कोल्हापूर : सर्वसाधारण (महिला)
- औरंगाबाद : सर्वसाधारण
- बीड : अनुसूचित जाती
- नांदेड : नागरिकांचा मागास प्रवर्ग
- उस्मानाबाद : सर्वसाधारण (महिला)
- परभणी : अनुसूचित जाती
- जालना : नागरिकांचा मागस प्रवर्ग
- लातूर : सर्वसाधारण( महिला)
- हिंगोली : सर्वसाधारण (महिला)
- अमरावती : सर्वसाधारण (महिला)
- अकोला : सर्वसाधारण (महिला)
- यवतमाळ : सर्वसाधारण
- बुलढणा : सर्वासाधारण
- वाशिम : सर्वसाधारण
- नागपूर अनुसूचित जमाती
- वर्धा : अनुसूचित जाती (महिला)
- चंद्रपूर :अनुसूचित जाती (महिला)
- भंडारा : अनुसूचित जमाती (महिला)
- गोंदिया : नागरिकांचा मागस प्रवर्ग
- गडचिरोली : नागरिकांचा मागस प्रवर्ग (महिला)