Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑक्टोबर ०४, २०२२

दिव्यांग व्यक्तींना व्यवसायास २ लाखापर्यंत कर्ज | chandrapur municipal


दिव्यांग व्यक्तींना व्यवसायास २ लाखापर्यंत कर्ज


घेतलेल्या कर्जावर मनपातर्फे २५ टक्के अनुदान




चंद्रपूर ३ ऑक्टोबर - चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरु करावयाचा असल्यास किंवा सुरु असलेला व्यवसाय वाढवायचा असल्यास राष्ट्रीयकृत बँकेमार्फत रुपये २ लक्ष ( दोन लाख रुपये ) पर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.

चंद्रपूर महानगरपालिका दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत विविध व्यवसाय उदा. ई रिक्षा खरेदी करणे, किराणा,कपडा, शिवणकाम केंद्र,संगणक प्रशिक्षण केंद्र, झेरॉक्स सेंटर व याव्यतिरीक्त इतर व्यवसायाकरीता दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत रुपये २ लक्ष ( दोन लाख रुपये ) पर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. तसेच दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तीकरीता त्यांनी घेतलेल्या कर्जावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे २५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्जाची आवश्यकता असल्यास दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय, ज्युबली हायस्कूल समोर, कस्तुरबा रोड या कार्यालयात कार्यालयीन वेळेत भेटुन अधिक माहीती घेता येईल. कर्जासाठी आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, बँक पासबुक, व्यवसायाचे कोटेशन, २ पासपोर्ट फोटो, राशन कार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (टीसी ) ही आवश्यक कागदपत्रे असुन कागदपत्रांची प्रत्येकी २ प्रती लाभार्थ्यांना आणावे लागतील. तरी नागरीकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.