जिल्हा परिषद,चंद्रपूर येथे नव्यानेच विवेक जॉनसन (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा दिनांक 03 ऑक्टोबर 2022 रोजी कार्यभार स्विकारला व रुजु होताच जि.प.च्या सर्व विभाग प्रमुखांची आढावा सभा घेण्यात आली. या आढावा सभेत सर्व विभागांनी आपल्या विभागा अंतर्गत येणाऱ्या योजनांच्या माहितीचे सादरीकरण केले. याप्रसंगी डॉ.मित्ताली सेठी (भा.प्र.से.), श्रीमती वर्षा गौरकर, अति मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. त्यानंतर मा. विवेक जॉनसन, मु.का.अ. यांनी जि.प. मुख्यालयातील सर्व विभागांना प्रत्यक्ष भेट देऊन सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून ओळख करून घेतली.
राज्यातील ४४ आयएएस अधिका-यांच्या आज बदल्या झाल्या असून, विवेक जॉन्सन चंद्रपूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी रुजू होत आहे.
(IAS 2018 batch/Maharashtra cadre) (IRS 2016 batch) (Mechanical Engineer) ते मूळचे Malappuram| Kerala येथील आहेत. डॉ. मिताली शेट्टी दीर्घरजेवर गेल्याने त्यांच्या रिक्त जागी नियुक्ती करण्यात आली आहे.
विवेक जॉन्सन हे अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी उस्मानाबाद कार्यरत होते. २०२० मध्ये प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा, साहाय्यक जिल्हाधिकारी भंडारा येथे बदलीझाली . कोरोनाच्या काळात २०२१ महदये पांढरकवडा येथे उपविभागीय महसूल अधिकारी म्हणून विवेक जॉन्सन होते. झरी प्रशासकपदी प्रकल्प अधिकारी, उपविभागीय अधिकारी केळापुर येथे त्यांनी जबाबदारी पार पडली.