चंद्रपूर | शहरातील भिवापूर प्रभागात असलेल्या राजीव गांधी नगर येथे जुन्या भूमिगत कोळसा खाणी संदर्भात वेकोली अधिकाऱ्यांनी सर्वे करून पाहणी केली. घुगुस येथे घडलेल्या भूस्खलन घटनेच्या पार्श्वभूमीवर सदर सर्वे असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मागील चाळीस-पन्नास वर्षांपासून राजीव नगर, सवारी बंगल्याजवळ एरिया हॉस्पिटल कंपाउंड लगत रावण एरिया, छत्तीसगड वस्ती वसलेली आहे. येथे मोठ्या प्रमाणात मजदूर कुटुंब राहतात. भिवापूर परिसरातील राजीव नगर येथे सरकारी स्वच्छालय जवळ सर्वेक्षण सुरू होते. ही वसाहत हटविण्यासंदर्भात सर्वे सुरू असल्याची अफवा कोणीतरी पसरवली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. इको प्रो या सामाजिक संस्थेचे महाकाली विभाग प्रमुख अब्दुल जावेद यांना माहिती कळल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्वे संदर्भात नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्याची विनंती केली. त्यानंतर आज 19 सप्टेंबर रोजी सब एरिया व्यवस्थापकांनी या परिसरात भेट देऊन सदर सर्वे भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना संदर्भात असल्याचे सांगितले. त्यानंतर येथील नागरिकांचे मनातील भीती दूर झाली आणि सर्वेला सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी नागरिकांनी दिले. यावेळी वार्डातील माजी नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांची देखील उपस्थिती होती.
राजीव गांधीनगरमे वेकोली का सर्व्हे; नागरिको मे घबराहट
आज 19 सप्तेंबर सोमवार सुबह 10 बजे भिवापुर प्रभाग राजीव गांधी नगर में आए उन्होंने बड़ी संख्या में उपस्तित नागरिकों को समझाया की ये घुग्गुस में जो हादसा हुआ उसे देखते हुऐ wcl को आदेश दिया गया हैं की ,wcl लगत जो क्षेत्र हैं उसका सर्वे किया जाय, ... किसी का भी घर नहीं टूटेगा ये सिर्फ़ सर्वे हैं डरने की कोई बात नहीं , नागरिकों के मन में जो भ्रम की स्थिति थी उससे लोगों ने राहत की सांस ली, बड़ी संख्या मे नागरिकों ने उपस्थित रहकर अपनी एकता दर्शाई इस समय वार्ड के माजी नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ता, उपस्थित थे..