डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या लढ्याला यश
राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार नाव जाहीर...
State-Teachers-Award-savitribai-fule
नागपूर – राज्य शासनाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.परंतु सदरील पुरस्काराला आजपर्यंत कोणतेही नाव नव्हते डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेने मागील पाच वर्षापासून राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार्या शिक्षक पुरस्काराला महाराष्ट्रच नव्हे तर भारत देशात बहुजनांना शिक्षण मिळावे या साठी आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या फुले दाम्पत्याचे नाव देऊन त्यांच्या महान कार्याचा गौरव करावा या साठी शासन दरबारी लढा दिला.मा.मुख्यमंत्री,मा.उपमुख्यमंत्री ,मा. शिक्षण मंत्री यांना वारंवार निवेदने दिली.प्रत्यक्ष भेटीत इतर पुरस्कारांना कोणाचे न कोणाचे नाव आहे उदा. राजीव गांधी खेल पुरस्कार ,अर्जुन पुरस्कार आदी बाबी शासनाच्या लक्षात आणून दिल्या व सदरील राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार हे नाव देणेच योग्य राहील ही मागणी लावून धरली.
डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेने मागील पाच वर्षापासून सुरु असलेल्या लढ्याला यश आले. महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णय काढुन राज्य शासनाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराला आता क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार हे नाव दिले आहे.सदरील निर्णयाचे डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे.या निर्णयामुळे शिक्षक वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.
सदरील शासन निर्णयाचे परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू पाटील भोयर,प्रदेशाध्यक्ष (प्रा) लक्ष्मण नेव्हल, प्रदेशाध्यक्ष (मा) प्रदीप सोळके, महासचिव सतीश काळे,महासचिव सुनील चव्हाण, कार्याध्यक्ष दयानंद जाधव, राज्यसमन्वयक शामराव लवांडे, नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर, उपाध्यक्ष शांताराव जळते,डॉ.विलास पाटील ,शालिक बोरशे,,विनोद पाटील,प्रा.शेषराव येलेकर,प्रभाकर पराड,राजकिरण चव्हाण,वसंत नेरकर,प्रा. लीलाधर पाटील,शिवशंकर स्वामी ,अविता वाघमारे , के.डी. वाघ, सचिव अनंत मिटकरी, वल्लभ गाढे, आर.एन. इंगळे, व्ही. एन. घायाळ, भास्कर कढवने, संजय लोखंडे, भास्कर शिंदे .अनिल घोरपडे आदींनी स्वागत केले आहे.