चंद्रपूर (chandrapur) : भारतीय संस्कृतीमध्ये सण, उत्सव व परंपरेला महत्त्वाचे स्थान आहे. देशभरात विविध भौगोलिक प्रदेशानुसार सर्वत्र सण, उत्सव व परंपरा साजरे केले जातात. भारतीय सण, उत्सव व परंपरेला पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने ही महत्व आहे. यामाध्यमातून पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे हा ही संदेश दिला जातो. सणांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण हा ही प्रमुख हेतू असतो. निसर्गाला किंवा पर्यावरणाला अनुसरूनच सर्व धर्माचे सण, उत्सव व परंपरा (Religious festivals, celebrations and traditions) आहेत. आजूबाजूच्या निसर्ग संपन्न वातावरणात सण साजरे केले जातात.
सध्या गरज आहे सगळे सण हे निसर्गपूरक किंवा पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे होण्याकरिता आज खासदार बाळू धानोरकर (balu Dhanorkar) यांच्या चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात गणेशाचे पर्यावरण पूरक विर्सजन केले.
चंद्रपूर महानगरपालिका (CCMC Chandrapur) प्रशासनाने फिरत्या कुंडात पर्यावरणपूरक विसर्जन करण्याचे आवाहन केले होते. आज खासदार बाळू धानोरकर यांच्या चंद्रपूर कार्यालयातील गणरायाचे विसर्जन करून त्यांच्या आवाहनाला साथ दिली आहे. चंद्रपूरकरांनी देखील अशा प्रकारे पर्यावरणपूरक विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे.
याप्रसंगी प्राध्यापक विजय बदखल, काँग्रेस ओबीसी नेते उमाकांत धांडे, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर विनोद अहिरकर, स्वीय सहाय्यक सतीश जोशी, गोविल मेहरकुरे, प्रफुल पुलगमकर, अनिल क्षीरसागर, सौरभ बनकर यांची उपस्थिती होती. Religious festivals, celebrations and traditions
सध्या कोरोना सोबत स्वाइन फ्लू चे संकट आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. गर्दी टाळणे, भौगोलिक अंतर राखणे, मास्क वापरणे, परिसराची स्वच्छता राखणे, प्रशासकीय नियमाचे पालन करणे आणि लसीकरणास प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना प्रत्येकाने पर्यावरणपूरक साजरा करण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. विघ्नहर्ता सर्व संकट दूर करून सर्वांच्या घरात आनंद, सुख, समृद्धी नांदन्याची प्रार्थना यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी केली
Prayer for joy, happiness, prosperity