चंद्रपूर | सध्या राज्यात कोणत्याही निवडणुका नाही. त्यामुळे युतीवर भाष्य करणे योग्य नाही. मात्र भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा जो कोणी उमेदवार असेल त्यांना भाजप सहकार्य करेल असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप आगामी निवडणुका एकत्रित लढतील असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी भेटीगाठी वाढल्यानंतर मनसे भाजप युती होणार का अशी चर्चा असताना त्या प्रश्नाला उत्तर देताना ही मैत्रीपूर्ण भेट होती, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. Chandrashekhar Bawankule
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे आणि आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः भेट घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनसे भाजपच्या युतीला चर्चेला वेग आला आहे. राज ठाकरे यांच्याशी माझे आणि अनेक भाजपा नेत्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांच्याशी होत असलेल्या भेटी त्याच संबंधातून आहेत. सध्या श्री गणेशोत्सव सुरू आहे. त्यावेळी एकमेकांच्या घरी आम्ही जात असतो. भेट झाली म्हणजे युती झाली असे होत नाही, असे मत आ. बावनकुळे यांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात दिले.