Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर ०२, २०२२

Maharashtra Rain Update | वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज...

 मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज...

मागील दोन पावसांपासून राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरु आहे. दिवसा भयंकर उकाड्यानंतर संध्याकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात होते. औरंगाबाद, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक ठिकाणी काल रात्रीपासून विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबई, घाट भागात‌ ढगाळ वातावरणाची अधिक शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उलाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
👉🏻 राज्यातील औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.