भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
प्रत्येक कार्यकर्त्याने किमान ५० नागरिकांचे मनपरिवर्तन करावे. एखदा मन परिवर्तन झालं की ते मतपरिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. कॉगेस, उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी ही तिन्ही पक्ष एकत्र आले तरी पुढील लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरचा खासदार भाजपचाच होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टीची बैठक आज चंद्रपुरातील महेश भवन येथे पार पडली. बैठकीत कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराजजी अहिर, खासदार अशोकजी नेते, आ. कीर्तीकुमारजी भांगडिया, आ. संजीवरेड्डीजी बोदकुरवार, जिल्हाध्यक्ष चंद्रपूर ग्रा. देवरावजी भोंगळे, भाजपा चंद्रपूर शहराध्यक्ष डॉ. मंगेशजी गुलवाडे, माजी आमदार अतुलजी देशकर, मा.आ. संजयजी धोटे, मा.आ. सुदर्शनजी निमकर, संध्याताई गुरनुले, मा.महापौर राखीताई कंचर्लावार व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Central BJP Mission Target Chandrapur Lok Sabha
चंद्रपूर लोकसभा आणि सर्व ६ विधानसभा महाराष्ट्रातल्या इतिहासातल्या सर्वात जास्त मताने जिंकण्यासाठी जवळपास 200 ते 225 दिवस बाकी आहेत आणि या दिवसात प्रयत्न करायचे आहेत. खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदींजीची (PM Narendra Modi) सर्वात जास्त प्रायोरिटी चंद्रपूर लोकसभेवर आहे. चंद्रपूरची लोकसभा जिंकली पाहिजे याकरता त्यांनी स्वतः अत्यंत विश्वासु असलेले पेट्रोलियम मंत्री हरजीत सिंह पुरी Hardeep Singh Puri यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. चंद्रपूरलातीन दिवस मुक्काम, 21 कार्यक्रम, सहा महिन्यात 18 महिन्यांमध्ये सहा वेळा भेटी असा कार्यक्रम आखण्यात आला आहे. 22, 23, 24 सप्टेंबर तारखेला पेट्रोलियम मंत्री हरजीत सिंह पुरी प्रवास करणार आहेत. त्या दिवशी या विजयाचा संकल्प या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.