Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, सप्टेंबर २५, २०२२

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात मराठी वाड्.मय अभ्यास मंडळाचे उद्घाटन |



सावली जि. चंद्रपूर (प्रतिनिधी) -

       राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे मराठी वाड्.मय अभ्यास मंडळाची स्थापना नुकतीच करण्यात आली. मंडळाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ प्रा. प्रशांत वासाडे होते. डॉ. दिवाकर उराडे,प्रा. चंदा पिसे, डॉ. रामचंद्र वासेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.  भाषा केवळ संवादाचे साधन नसून साहित्याच्या क्षेत्रात ती एक आत्माविष्काराचे सशक्त माध्यम आहे. झाडीपट्टीचा प्रदेश हा सर्वगुणसंपन्न असा महाराष्ट्राचा पूर्वेचा भाग असून येथील कला- साहित्य- संस्कृती प्राचीन असून येथील झाडीबोलीचा गोडवा हा अमिट आहे.  झाडीबोली सारख्या  अनेक बोली शब्दांमुळे आपली मराठी भाषा समृद्ध होत असते, म्हणून आपल्या बोलीभाषेचा प्रत्येकांस  अभिमान असायला हवा . आपल्या  झाडीबोलीचा गौरव  वाढवायला हवा ,असे प्रतिपादन उद्घाटनाप्रसंगी बंडोपंत बोढेकर यांनी केले. प्रास्ताविकपर भाषण प्रा. डॉ. रामचंद्र वासेकर यांनी केले. अभ्यास मंडळाचे महत्त्व  यावर  प्रास्ताविक प्रा. चंदा पिसे यांनी केले तर अतिथींचा परिचय आणि वाड्.मय मंडळाच्या कार्यावर डॉ. रामचंद्र वासेकर यांनी प्रकाश टाकला. याप्रसंगी नव्या मराठी वाड्मय अभ्यास मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात 

 किशोर बोरकुटे अध्यक्ष ,रोहित कोसरे उपाध्यक्ष ,कु. साक्षी शीडाम सचिव ,कु. आषाली मोहुर्ले कोषाध्यक्ष, प्रफुल्ल गेडाम सहसचिव,कु.  सुप्रिया दुधे उपाध्यक्ष आणि सदस्य म्हणून समीर गेडाम, कु. अनुराधा बुद्मवार,कु. मानसी नायबणकर,कु. प्रांजली गंडाटे,कु. जयश्री चांदेकर यांचा समावेश करण्यात आला.निवड झालेल्या नुतन कार्यकारीणी सदस्यांना ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रा. प्रणाली खोब्रागडे, प्रा. सदानंद बागडे, डॉ. प्रफुल वैराळे, प्रा. रोशन गुरनुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. Inauguration of Marathi Music School in Mahatma Gandhi College


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.