विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने जपली सामाजिक बांधिलकी
*खापरखेडा-प्रतिनिधी* Nagpur News
विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात मागील वर्षी ३०६ रक्तदात्यांनी रक्तदान केले मात्र ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी मागील वर्षीचा रक्तसंकलनाचा उच्चांक मोडीत काढून ३३१ रक्तदान केले असून संघटनेने समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जपली आहे. blood donation
१ ते २ सप्टेंबर ला प्रकाशनगर वसाहतीत असलेल्या मनोरंजन केंद्र-२ येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संघटनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिराचे उदघाटन मुख्य अभियंता राजू घुगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रामुख्याने केंद्रीय अध्यक्ष रविंद्र बारई यांच्यासह केंद्रीय उपाध्यक्ष शैलेन्द्रकुमार अर्जितवार, भारतीय सेना कामठी युनिटचे अधिकारी गायधने विश्वस्त महाराष्ट्र कल्याण मंडळ किशोर फाले, उपमुख्य अभियंता डॉ.अनिल काठोये, जितेंद्र टेंभरे, अधिक्षक अभियंता विश्वास सोमकुवर, वैद्यकीय अधिकारी डॉ अमित ग्वालवंशी, कल्याण अधिकारी अमरजीत गोडबोले, सहाय्यक महाव्यवस्थापक नितीन काळे, माजी केंद्रीय उपाध्यक्ष गजानन सुपे, बापू देशमुख, नानाजी मुंगसे, प्रकाश परमार, सुनिल वंजारी आदि उपस्थित होते.
रक्तदान शिबिर कार्यक्रमा दरम्यान डॉ.ग्वालवंशी यांनी रक्तदानाचे महत्त्व समजावून सांगितले तर माजी केंद्रीय उपाध्यक्ष गजानन सुपे यांनी संघटनेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल माहिती विषद केली याप्रसंगी वर्तमान केंद्रीय उपाध्यक्ष शैलेन्द्रकुमार अर्जितवार रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान असल्याचे सांगितले यावेळी शेकडो वीज कामगार, कंत्राटी कामगार, अधिकारी वर्ग व सामाजिक कार्यकर्त्यानी रक्तदान शिबिरात भाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक झोन अध्यक्ष संजीवकुमार गर्जे, संचालन झोन सचिव विलास शेंडे तर आभार झोन सहसचिव भूषण दाणी यांनी मानले रक्तदान शिबिर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने संघटनेचे सदस्य व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. Nagpur Rural