Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट ०७, २०२२

राज्यपक्षी हरीयाल संकटात; शिकारीचा व्हिडिओ वायरल




चंद्रपूर (Chandrapur) : दुर्मिळ पक्षांची शिकार करून पक्षी हातात घेऊन जात असतांनाचा एक विडीओ वायरल (viral video) झाला आहे. चंद्रपूर शहरातील राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, (

Rajiv Gandhi College of Engineering, Research & Technology

) चंद्रपूर परिसरात हा प्रकार सुरु असल्याचे पर्यावरणप्रेमीचे म्हणणे आहे.

वन्यजीवांचा मोठा अधिवास असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात शिकारीचे प्रमाण वाढले आहे. वाघ, तृणभक्षक प्राण्यांचा शिकारीचा अनेक घटना उघड झाल्या आहेत. मात्र, आता थेट शहरातच पक्षांची शिकार केल्या जात असल्याचा विडीओ समाजमाध्यमात वायरल झाला आहे. "फोटो मत निकाल बोला ना तेरे कु..! समज नही आ रहा क्या..! एकबार बताया तो...! " असं विडीओ काढणाऱ्याला तस्कर तरूण धमकावित आहे. हा व्हिडीओ राजीव गांधी college जवळील असल्याचे पर्यावरण प्रेमी संस्थेच्या Whatsapp Groupमध्ये म्हटले आहे.


राज्यपक्षी हरीयाल संकटात ; शिकारीच प्रमाण वाढलं

महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी असलेला हरीयाल पक्षी संकटात आला आहे.चंद्रपूरात वायरल झालेल्या विडीओने पक्षीमित्रांची चिंता वाढविली.राजरोषपणे हरीयाल पक्ष्याची शिकार सूरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.शासनाचे वाघांचा स्वरक्षणावर अधिक लक्ष आहे.असायला हवेही मात्र ज्या पक्षाला राज्यपक्षी म्हणून घोषीत केलं त्या पक्ष्याचा स्वंरक्षण आणि सवर्धनाकडेही लक्ष द्यायला हवे.दुदैवाने तसे झाले नाही.वायरल झालेल्या शिकारीचा विडीओ बघून शासनाचे डोळे आतातरी उघळावे अन राज्यपक्ष्याचा सवर्धनासाठी केलेल्या कार्याची उजळणी शासनाने करावी ,ही माफक आशा पक्षी मित्रांना आहे.

चंद्रपूरात सूरू असलेल्या पक्षांच्या शिकारीचा विडीओ वायरल झाला.शिकार केलेले पक्षी राज्यपक्षी हरीयाल असल्याचे दिसत आहे.थेट शहरात राज्यपक्ष्याची शिकार सूरू असतांना याचा मागमुस वनविभागाला नसावे हे आश्चर्यकारक असल्याचा प्रतिक्रिया आता उमटत आहेत.या वायरल विडीओने वनविभागाचा कार्यप्रणालीवर बोट ठेवलं आहे.

चंद्रपूर जिल्हा वाघांसाठी प्रसिध्द आहे.मात्र चंद्रपूर जिल्ह्याचा हीरव्यागार अरण्यात अनेक दुर्मिळ वन्यजीवांचा अधिवास आहे.केवळ वन्यजीवच नाही तर विविध जातीचे पक्षी इथं घर करून आहेत.मात्र या दुर्मिळ जिवांचा अधिवासाकडे कायमचेच दुर्लक्ष झाले आहे.मोठ्या संख्येने स्थलांतरीत पक्षी इथल्या पाणवठ्यावर येतात.जिथे राज्यपक्षीच संकटात आहे तिथं या पाहूण्यांकड कोण लक्ष देणार ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ऐका वन्यजीवप्रेमीनं शिकारीचा विडीओ वायरल केला अन वन्यजीवच नव्हे तर इथले पक्षी सूध्दा संकटात असल्याचं भिषण वास्तव्य समोर आणलं.या विडीओने पक्षांचा सूरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा उभा झाला आहे.
विदर्भात पक्ष्यांच्या शिकारीच प्रमाण वाढल्याचे दिसतं.जंगलात शिकारीच प्रमाण कमी झालं असलं तरी शहरी भागात वाढलं आहे.हे दुदैवी असल्याची प्रतिक्रिया वन्यजीव अभ्यासक प्रा.सूरेश चोपणे यांनी दिली.


viral video | photographer |

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.