Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट ०७, २०२२

अकोल्यातील डॉक्टरविरुद्ध चंद्रपुरात गुन्हा दाखल

khabarbat Chandrapur

चंद्रपूर (Chandrapur) : साळभावास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अकोला (Akola) जिल्यातील डॉ ज्ञानेश्वर तराळे आणि त्यांच्या पत्नी डॉ मोनिका ज्ञानेश्वर तराळे यांच्यावर जिल्ह्यातील दुर्गापूर (Durgapur) पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  





तेल्हारा तालुक्यातील रहिवासी असलेल्या मोनिका तराळे यांची बहीण अर्पणा हिचे लग्न 2018 मध्ये चंद्रपूर Chandrapur) येथील निलेश भटकर याच्याशी झाले. मात्र माहेरच्या कारणावरून त्यांच्यात भांडणे होऊ लागली. 23 जून 2021 ला अपर्णा भटकर ही दुसऱ्यांदा गर्भवती असताना तिने तिची बहीण डॉ. मोनिका तराळे आणि भावजी डॉ. ज्ञानेश्वर तराळे यांना बोलावून घेतले. यावेळी या दोघांनीही फिर्यादी निलेश भटकर याला धक्काबुक्की करीत अश्लील शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर अपर्णा आपल्या माहेरी कोल्हापूरला (Kolhapur) निघून गेली. 15 जून 2022 ला निलेश तिला परत आणण्यासाठी गेला असता पुन्हा त्याला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी निलेश भटकर यांनी दुर्गापूर पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दिली. 

शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल चंद्रपूर भादवी कलम 294, 504, 506 आणि 34 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक स्वप्नील धुळे (PI Swapnil Dhule) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


 #Chandrapur #Akola #Police



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.