एक जिल्हा, एक गणवेश आणि एक अभ्यासक्रम असावा; आमदार प्रतिभा धानोरकर यांची विधानसभेत मागणी
चंद्रपूर/ मुंबई : खाजगी कॉन्व्हेंट शिक्षणाच्या माध्यमातून पालकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असून, गणवेश आणि शालेय पुस्तकांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक बोझा सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्यांमध्ये एक जिल्हा, एक गणवेश आणि एक अभ्यासक्रम असावा अशी मागणी भद्रावती- वरोरा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पावसाळी अधिवेशनात आज 23 ऑगस्ट रोजी केली. pratibha Dhanorkar | Education
त्या म्हणाल्या, मीसुद्धा जिल्हा परिषद शाळा शिकली आहे. आपल्याला फक्त एकच ड्रेस असायचा आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आली की, कपडे धुण्यासाठी आपल्याला शाळेतून सुट्टी मिळायची. मात्र आता ज्या काही खाजगी शाळा आहे त्या खऱ्या अर्थाने पालकांना खर्चाचा बोजा वाढवीत आहेत. म्हणून कुठेतरी पालकांचा हा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी शासनाने प्रत्येक ठिकाणी एकच अभ्यासक्रमाची पुस्तके हे कशी देता येईल, असे धोरण आखावे, त्यासोबत एक शाळा, एक गणवेश किंवा एक जिल्हा; एक गणवेश ही संकल्पना संपूर्ण राज्यात कशी राबवता येईल, यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी केली. या खाजगी शाळांच्या माध्यमातून जे पालकांचे शोषण होत आहे, ते त्या ठिकाणी थांबवण्यात येईल.
यावेळी त्यांनी शालेय, ग्रामविकास आणि शाळांना अनुदान या विषयावर चर्चा केली. पूरपरिस्थितीमुळे माझ्या सुद्धा मतदारसंघात साधारणतः 33 ते 35 गाव हे पूर्णपणे पाण्याखाली आले. त्यांना मदत देण्यात यावी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिलेली स्थगीती तात्काल हटवून आणि ग्रामीण मतदारसंघात जे काम करणारे आमदार आहेत त्यांना प्रामाणिक न्याय या सरकारच्या माध्यमातून द्यावा, अशी रास्त मागणी त्यांनी केली. आदिवासी विभागाअंतर्गत चर्चा करत असताना दर्जा वाढीचे अनेक प्रस्ताव आदिवासी विभागात अजूनही प्रलंबित आहे, कुठेतरी प्रस्ताव तात्काळ मंजूर करून प्रत्येक शाळांना या ठिकाणी न्याय देण्यात यावा, शासनाकडे मागणी केली.
Pratibha Dhanorkar is an Indian politician from Maharashtra and a member of the Indian National Congress. She was elected as a member of the Legislative ...