Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट २३, २०२२

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवू # Gondwana Gantantra Party

_गोगपाचे प्रदेशाध्यक्ष हरीश उईके यांचे प्रतिपादन
_जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक


चंद्रपूर - आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायतीच्या निवडणूका स्वबळावर लढवून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला सुरूवात करावी, असे आवाहन गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हरीश उईके यांनी कार्यकर्त्यांना केले.

चंद्रपूर येथील विश्राम गृह येथे आज 21 ऑगस्ट रोजी गोंडवाना गणतंत्र पार्टीची जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुका लक्षात घेता आवश्यक त्या सूचना केल्या.
बैठकीला गोगपाचे राष्ट्रीय सचिव गोंडराजे विरेंद्रशहा आत्राम, प्रदेश कार्यवाहक मनोज आत्राम, प्रदेश सचिव सुधाकर आत्राम, जिल्हा अध्यक्ष बापुजी मडावी, महासचिव विजयसिंह मडावी , जिल्हा उपाध्यक्ष :कमलेश आत्राम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
चंद्रपूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात देखील लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. या निवडणुकांमध्ये पक्षाचे अधिकाधिक उमेदवार निवडुन आणण्याच्या दृष्टीने या बैठकीत आढावा घेण्यात आला. पक्षाचे संघटन गावपातळपासून शहरापर्यंत सर्वत्र मजबूत करून शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व जनसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी रेटून धरत त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोपासावी, असेही आवाहन हरीश उईके यांनी यावेळी केले. येणा-या सर्व निवडणुका स्वबळावरच लढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
या बैठकीला जिल्ह्यातील महत्वाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
…………..

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.