Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट ११, २०२२

NMMS परीक्षेत तब्बल 15 विद्यार्थी उत्तीर्ण | National Means-cum-Merit Scholarship Scheme

 मनपा शाळेच्या यशाची परंपरा कायम

NMMS परीक्षेत तब्बल 15 विद्यार्थी उत्तीर्ण

गुणवत्ता यादीत असल्यास मिळणार शिष्यवृत्ती


Chandrapur News
चंद्रपूर ११ ऑगस्ट -  NMMS  (National Means-cum-Merit Scholarship Scheme ) परीक्षा म्हणजे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेतल्या  जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत मनपा सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळेचे १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन जर गुणवत्ता यादीत आले तर त्यांना सलग ४ वर्षेपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे.
     मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या नेतृत्वात मनपा शाळा आपला दर्जा सतत उंचावत असुन   मनपा शाळांचे शिक्षक विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहीत करत असतात. या परीक्षेसाठीही शिक्षकांचे पुर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले होते. 

सदर परीक्षेत सत्र 2020-21 मध्ये मनपा शाळेचे 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते तर आता सत्र 2021-22 मध्ये 15 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षीक १२,०००/- एवढी शिष्यवृत्ती सलग ४ वर्षे म्हणजे इयत्ता ८ वी ते १२ वी एकुण ४८,०००/-रु शिष्यवृत्ती मिळते. १२ वी पर्यंत शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना या परीक्षेचा लाभ मिळतो.इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु.1,50,000/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होते.
     सन २००७-०८ पासुन आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना ही मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्सेस भारत सरकारमार्फत राबविली जात आहे. इयत्ता 08 वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या NMMS योजनेचे उद्दिष्ट आहे.


     मनपा सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक नागेश नीत,वर्ग शिक्षक अरूण वलके, विषय शिक्षक भास्कर गेडाम, शिवलाल इरपाते,सचिन रामटेके यांच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांना हा टप्पा गाठण्यास मदत मिळाली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.