सर्व युवकांनी एकजुटीने संघटन मजबूत करा
- कुणाल राऊत यांचे युवकांना आवाहन
चंद्रपूर युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न
chandrapur news (चंद्रपूर)
देशात सध्या फारच बिकट परिस्थिती सुरू आहे. महागाई बेरोजगारी, महिला अत्याचार या समस्या समोर आहेत. मात्र केंद्रातील मोदी सरकारचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. सरकार विरोधात आवाज उचलण्याचा प्रयत्न केला तर ईडी चौकशी लावून आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंवर जीएसटी आकारून महागाई आणखी वाढवली आहे. लोकांच्या हाताला रोजगार नाही यांना रोजगार काँग्रेसच्या माध्यमानेच मिळू शकेल. भाजप सरकारला सत्तेवरून खेचायचं असेल तर आपण युवकांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे. यासाठी आपण सर्व युवकांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे.
असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री कुणाल राऊत यांनी केले. चंद्रपूर युवक काँग्रेसच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री कुणाल राऊत, महाराष्ट्राचे प्रभारी प्रदीप सिंधव, काँग्रेस महासचिव श्री श्रीनिवास नालमवार, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सचिव व गुजरात प्रभारी अजित सिंग, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार, राष्ट्रीय काँग्रेसचे चंद्रपूर शहर अध्यक्ष राजेश अडूर, युवक काँग्रेसच्या महासचिव व चंद्रपूर प्रभारी नेहा निकोसे, युवा काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष शंतनू धोटे, युवक काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रभारी पंकज सावरकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव साईस वारजुरकर, महासचिव डॉक्टर प्रणित जांभुले, कुणाल चाहर, सुभाष गौर आदी उपस्थित होते.
युवक हा देशाचा कणा आहे, आपण भावी नेते आहात. आपण युवक काँग्रेसच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत रहा. युवक काँग्रेस हा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जाण्याचे एक व्यासपीठ आहे. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका तसेच इतर निवडणुकीत जास्तीत-जास्त युवा वर्गाला तिकीट मिळावे अशी मागणी आम्ही केली आहे. जे पात्र असतील त्यांना नक्कीच तिकीट मिळेल, मात्र इतरांनी नाराज होऊ नये.
चंद्रपूर जिल्ह्यात 15 तालुके आणि 1817 गावे आहेत. जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्र आणि दोन लोकसभा क्षेत्र आहेत. या शहराला राजकारणाचा मोठा वारसाही लाभलेला आहे. चंद्रपूर शहर हे इंडस्ट्रियल शहर म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात ओळखले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवा नेतृत्व मिळावे असा आमचा प्रयत्न राहणार आहे.
"माझे गाव माझी शाखा" ही मोहीम आपल्याला अधिक व्यापक करायची आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात माझे गाव माझी शाखा सुरू करायची आहे. शाखेच्या माध्यमाने त्या गावातील समस्या सोडविण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. युवकांना एक चांगले व्यासपीठ आणि राजकारणात येण्याची युवक काँग्रेसक्या माध्यमाने संधी मिळणार आहे. असेही कुणाल राऊत म्हणाले.
दरम्यान महाराष्ट्राचे प्रधान प्रभारी प्रदीप सिंम, युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार, सुभाष गौर यांनीही मार्गदर्शन केले. संचालन प्रलय मशाखेत्री यांनी प्रास्ताविक चंद्रपूर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू थोटे यांनी तर आभार युवक काँग्रेसचे राजुरा तालुकाध्यक्ष विशाल खडसे यांनी मानले.
breaking news
breaking news headlines
news live
google news
local news
azadi ka amrut mahotsav
chandrapur news
chandrapur india
news 34 chandrapur
chandrapur breaking news today
chandrapur pin code
chandrapur temperature
chandrapur weather
chandrapur news
chandrapur district
chandrapur map
chandrapur to pune train
is pc chandra open today
chandrapur express news
chandrapur district news
news of chandrapur
nagpur india
weather for nagpur
nagpur weather
nagpur university
nagpur airport
nagpur temperature
nagpur mumbai expressway