Chandrapur News
चंद्रपूर | बल्लारपूर शहरात जानेवारी महिन्यात खंडेलवाल ज्वेलर्स सराफाला दोन लाखांनी गंडविणारा बनावट आयकर अधिकारी 27 वर्षीय विशाल निलंगे हा पोलिसांच्या ताब्यात आला आहे. (fake-income-tax-officer-arrested-for-threatening-businessman-for-money-demand)
बल्लारपूर शहरातील खंडेलवाल ज्वेलर्स च्या तक्रारीनंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असताना बंगळुरू पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान सध्या हा भामटा बल्लारपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. राज्यात अन्यत्र सराफा व्यावसायिकांची झालेली फसवणूक आता पुढे येणार असून, बल्लारपूर पोलीस लुटीचे दागिने हस्तगत करण्यासाठी कारवाई करत आहेत.
Fake Income Tax Officer Vishal Nilange
भामटा महागड्या लक्झरी गाड्या- विमान व रेल्वे प्रवास करत सराफा व्यावसायिकांकडे आयकर अधिकारी म्हणून पोहचायचा. सराफांना विविध प्रश्नांनी भंडावून सोडत त्यांना हळूच दोन लाखांपर्यंतचे दागिने खरेदी करण्याची ऑफर द्यायचा. दागिने खरेदी करत ऑनलाइन पैसे देत एखादा जुना पेमेंट स्क्रीनशॉट दाखवून लगेच पसार व्हायचा. आपले सिम व मोबाईल तो देखील फेकून देत असल्याने याला पकडणे अशक्य झाले होते. जानेवारी महिन्यातील बल्लारपूर शहरातल्या घटनेनंतर पोलिसांनी देशभर या इसमाचा तपास चालविला होता. दरम्यान मूळ कर्नाटक राज्यातील बिदर चा रहिवासी असलेला विशाल याने दिल्ली -झारखंड- ओडिशा- कर्नाटकचे अनेक जिल्हे व महाराष्ट्रात सराफा व्यावसायिकांना असाच चूना लावल्याचे कबूल केले आहे.
ballarpur Police