एन.एम. एस.एस शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र
निफन्द्रा प्रतिनिधी
-प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे या साहयातून त्यांची बुद्धिमत्ता विकसित व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते जून 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेची गुणवत्ता यादी प्रकाशित झाली. त्यात सावली तालुक्यातील निफांद्रा येथील प्रवीणभाऊ आडेपवार माध्यमिक विद्यालयातील धनश्री पुरुषोत्तम समर्थ , कसक माणिकचंद उंदीरवाडे, शुभांगी देवनाथ राणे हे विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना वर्ग नववी ते बारावी पर्यंत वार्षिक रुपये 12000 शिष्यवृत्ती मिळणार आहे. पात्र विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श गजानन यनगंदलवार सचिव रवींद्र आडेपवार ,विजय आडेपवार,संस्थेचे पदाधिकारी मुख्याध्यापक रवींद्र कुडकावार शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे, सर्वत्र विद्यार्थ्याचे कौतुक होत आहे.