चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मण समाजा संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर शहराने आज दिली पोलिसांकडे तक्रार
13 ऑगस्ट रोजी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील भद्रावती या ठिकाणी काँग्रेस खासदार बाळू धानोरकर Suresh (Balu) Dhanorkar यांनी जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य आक्षेपार्ह असून *पोलिसांनी त्या वक्तव्याची चौकशी करून बाळू धानोरकर विरोधात उचित कारवाई करावी अशी मागणी* आज आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा, नागपुर (Nagpur) शहरातर्फे केली.
काँग्रेस पक्षाच्या आजादी गौरव यात्रे दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे 13 ऑगस्ट रोजी बाळू धानोरकर Suresh (Balu) Dhanorkar यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे आहे, ब्राह्मणांच्या पोटी जन्माला येऊनच मोठे पद मिळते असे वक्तव्य केले होते. धानोरकर यांनी त्यांच्या वक्तव्यातून जातीय विद्वेष निर्माण होईल असे प्रयत्न केल्याचा आमचा थेट आरोप आहे. तसेच धानोरकर यांनी जाणीवपूर्वक हे व्यक्तव्य केले आहे व त्यामुळे विविध जातीत दंगे पसरू शकतात अणि कायदा सुव्यवस्था भंग होण्याची दाट शक्यता देखील नाकारता येत नाही. एका खासदाराकडुन या पद्धतीचे शिवराळ भाषेत बोलणे हे अतिशय अशोभनिय, गैरवर्तनीय व असंविधानिक आहे.
या करीता भाजयुमो तर्फे धंतोली पोलीस स्टेशनला निवेदनात संबधित वक्तव्यावर भादंविच्या कलमांच्या १५३, १५३-अ, ५०४ अंतर्गत कारवाही करावी ही विनंती करण्यात आली आहे. तक्रारकर्ता म्हणुन भाजयुमो तर्फे दीपांशू लिंगायत, महामंत्री, भाजयुमो, नागपूर यांनी निवेदन दिले व फडणवीस यांनी नागपुरात अनेक ब्राह्मणेतर कार्यकर्त्यांना ही पक्षात मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या असून भाजपमध्ये कधीही जबाबदारी देताना जात पाहिली जात नाही असा दावा तक्रारकर्ता दीपांशू लिंगायत यांनी केला आहे.
यावेळी प्रामुख्याने भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके, भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे, भाजयुमो प्रदेश सचिव कल्याण देशपांडे यांच्या मार्गदर्शनात व भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.
यावेळी रितेश राहाटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भाजयुमो महाराष्ट्र, मंडळ अध्यक्ष शेखर कुर्यवंशी, बादल राऊत, निलेश राऊत, अमर धरमारे, पंकज सोनकर, शहर संपर्क प्रमुख सचिन सावरकर, ईशान जैन, घनश्याम ढाले, प्रसिद्धी प्रमुख प्रसाद मुजुमदार, मनमित पिल्लारे, करन यादव, अमित बाराई, आकाश भेदे, गोविंदा काटेकर, रीतेश पांडे, सौरभ पराशर, उपाध्यक्ष देव यादव, अर्पित मालघाटे, सागर घाटोले, अक्षय शर्मा, दिपेश यादव, रविकांत शाक्य, आकाश बानिया, ईशान चौरसिया, वरुण मेहाडिया, सुनील पांडे, तुषार जौंजाळ, समीर मांडले, पवन महाकाळकर, उमेश गोईकर, विक्की बगले, अमित सलामे, बलराम मानुजा, पिकेश पटले, रोशन डोंगरे, आशुतोष भगत, नागेश साठवणे, वेदांत जोशी उपस्थित होते.
Suresh (Balu) Dhanorkar politician from Chandrapur district, Maharashtra. He was a member of the 13th Maharashtra Legislative Assembly.