Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट ३१, २०२२

वंचितने केले शक्ती प्रदर्शन मेळाव्याला अफाट गर्दी



चंद्रपूर(का.प्र.)-वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर (vanchit bahujan aaghadi chandrapur) जिल्हा व महानगर च्या वतीने आयोजित सत्ता संपादन मेळाव्याला अफाट गर्दी झाल्याने ते एकप्रकारचे शक्ती प्रदर्शन झाले. या मेळाव्यास पूर्वी मेळाव्याच्या उदघाटक रेखाताई ठाकूर व प्रमुख मार्गदर्शन सर्वजीत बंसोडे यांचे नेतृत्वतात आंबेडकर पुतळयापासून भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेच्या अग्रभागी वंचित समुहाच्या विविध घटकांचे सांस्कृतिक जथ्थे ज्यात ग्रामीण भजन मंडळ, लभान महिला नृत्य, संबळ वाघ, पोतराज हे लक्ष वेधून घेत होते. शेकडो कार्यकर्त्यांच्या प्रचंड जयघोषात ही पदयात्रा मेन रोडने जयंत टॉकीज, छोटी बाजार, पंचशील चौक, टेलीफोन ऑफीस मार्गे राजीव गांधी सभागृहात पोहोचली. 




सदर मेळाव्यात मार्गदर्शन करतांना पक्षाच्या महाराष्ट्र अध्यक्षा रेखाताई ठाकूर म्हणाल्या की महाराष्ट्रात दररोज वंचित घटकातील अनेक जाती समूहाचे लोक पक्षात मोठया संख्येने येत आहेत हे मला महाराष्ट्राच्य दौर्‍यात आढळून आले. सत्ताधारी पक्षाच्या धोरणावर जनता प्रचंड नाराज असल्याने व विरोधी पक्ष भयग्रस्त असल्याने जनतेला प्रामुख्याने दलीत, आदिवासी, ओबीसी अल्पसंख्यांक घटकांना वंचित बहुजन आघाडी एक सक्षम पर्वाचे दिसत आहे. ही संधी आहे. आपण सर्व वंचित घटकांचे प्रश्‍न घेऊन संघर्ष उभा करा. सत्ता नक्कीच आपल्या हाती येईल.
या मेळाव्याला सर्वजीत बन्सोडे यांनीही आपल्या विशिष्ट शैलीत प्रभावी मार्गदर्शन केले. कुशल मेश्राम, डॉ. रमेश कुमार गजबे, प्रफुल मानके, मुर्लीधर मेश्राम, अरविंद सांदेकर राहूल वानखेडे, बंडू नगराळे, भगवान गौडे, भुषण फुसे, आनंदराव अंगलवार कविता गौरकारयांनीही समसयोचित मार्गदर्शन केले. सूत्र संचालन तनुजा रायपुरे, प्रस्तावित प्रा. नितिन रामटेक,े तर आभार व्यक्त लिनाताई रामटेके यांनी केले. याप्रसंगी मंचावर महानगर जिल्हाध्यक्ष बंडू ठेंरे, मधु वानखेडे, मोनाली पाटील यंची उपस्थिती होती. मेळाव्याला अफाट करण्यासाठी रमेश ठेंगरे, विजय जुलमे, दिलीप वाळके, किशोर रायपुरे, प्रकाश तोहोगावकर, सोहमप्रभु मुंजनकर, धर्मेंद्र शेंडे, विजय जिवने, मधूकर उराडे, डेवीड खोब्रागडे, शैंलेंद्र बारसागडे, भगवान आभारे, सिध्दार्थ शंभरकर, ओम रायपुरे सहीत असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



बाढीया आयोग हे संविधानाची अहवहेलना आहे. दर दहावर्षानी जनगणना व्हाला पाहिजे हं बंधनकारक आहे. पण भाजप सरकार करीत नाही. ओ.बी.सी.ची जनगणना न करण्याचं भाजप सरकारने शपथपत्र दिल. जनगणनेशिवाय ओ.बी.सी.चं राजकीय आरक्षण धोक्यात आलं. पुढे शिक्षण आणि नोकर्‍यातील आरक्षण संपेल.हे ओ.बी.सी.च्या नेत्यांनी लक्षात घ्यावे. इतर पक्ष ओ.बी.सी.चा लढा लढत नसतीलतर त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना साथ दयावी. तेच खरं ओबीसीचं नेतृत्व आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.