Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट १७, २०२२

Kidnapping update News | तीन कोटींच्या खंडणीसाठी दोघांचे अपहरण |


Kidnapping update News

चंद्रपूर (Chandrapur) : तीन कोटींच्या खंडणीसाठी ऑनलाईन क्रिकेट सट्टा व जुगाराचे रॅकेट चालविणाऱ्या प्रदीप गंगमवार व त्याचा मित्र राजेश झाडे या दोघांचे चौघांनी मिळून सरताज या मित्राच्या मदतीने अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपहरणकर्त्या चौघांचा शोध घेण्यासाठी तीन शोध पथक तयार करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी दिली. अपहरणकर्त्यांच्या तावडीतून गंगमवार व झाडे यांनी सुखरूप सुटका केली.

Kidnapping-of-Cricket-bookie

येथील महाकाली वॉर्ड (Mahakali) परिसरातील बालपणीचे मित्र प्रदीप गंगमवार व राजेश झाडे या दोघांवर जुगाराचे गुन्हे दाखल आहेत. ऑनलाईन क्रिकेट सट्टा प्रकरणी गंगमवार यांना गडचिरोली पोलिसांसोबतच चंद्रपूर व इतर जिल्ह्यातील पोलिसांनी अनेकदा अटक केली आहे. खुनाच्या आरोपात 10 वर्षे शिक्षा भोगलेल्या सरताज हाफिज यांच्यासोबत ओळख झाली होती. 15 ऑगस्टला पावसात तिघेही जुगार खेळण्यासाठी निघाले. तुकुमला पोहचल्यावर वाहन लावताना अचानक 4 जणांनी गाडीत प्रवेश केला आणि त्यांना चाकुचा व बंदुकीचा धाक दाखवत गंगमवारला 3 कोटीची मागणी केली.

गंगमवार यांनी 50 लाख देण्याची तयारी दाखवली. यासाठी त्यांनी यवतमाळ येथील मित्राला फोन केला. मात्र, पैसे 16 ऑगस्टला मिळेल असे त्याने सांगितले असता त्या 4 जणांनी वाहन मूल, सिंदेवाही, नागभीड व उमरेड मार्गे थेट नागपूरला आणले. वाटेत उमरेडला पोहचल्यावर चार पैकी 1 त्याठिकाणी उतरला, त्यानंतर वाहन पहाटे 3 वाजताच्या सुमारास मोमीनपुरा येथे दाखल झाले. तेथे वाहन थांबविण्यात आले. याचा फायदा घेत राजेश झाडे हा गाडीच्या खाली उतरत वाचवा वाचवा ओरडू लागला. नागरिक राजेशकडे धावले. नागरिकांची गर्दी जमा होत असताना आरोपीने राजेशला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी मोमीनपुरा (Mominpura) येथे पोलिस असल्याने त्यांनी राजेशला सोडले. अपहरणाचा कट फसला असे वाटताच आरोपींनी पळ काढला. त्यांच्यासोबत सरताजनेही पळ काढला. पोलिसांनी राजेश व प्रदीपला पोलिस ठाण्यात आणून विचारपूस केली असता त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. गंगमवारच्या तक्रारीची नोंद घेत गुन्हा दाखल केला.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.