AIILSG News : Course Inauguration LGS LSGD
नागपूर, ता.28. नगरपालिका व महानगरपालिकेचे काम करताना दडपण, अडचणींचा सामना करावा लागतो, अनेक मनःस्ताप सहन करावे लागतात, अशा वेळी सत्यता, स्वभाव, सकारात्मकता, ज्ञान संपादन करण्याची वृत्ती, निरपेक्षता या पाच तत्त्वांचा अंगिकार केला तर नगरपरिषदेचे किंवा महानगरपालिकेचे काम करणे अगदी सोपे जाईल, असा सल्ला हिंगणघाट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांनी केले.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एलजीएस आणि एलएसजीडी अभ्यासक्रमाच्या जुलै बॅचच्या शुभारंभ आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय संचालक जयंत पाठक, सनदी लेखापाल जयंत पत्राळे प्रामुख्य़ाने उपस्थित होते.
पुढे बोलताना हर्षल गायकवाड यांनी नगरपरिषदेत किंवा महानगरपालिकेत काम करताना काय काय अडचणी येऊ शकतात, त्याचा सामाना कसा करायचा हे सांगितले. काम करताना आपल्या नविन गोष्टी शिकता आले पाहिजे, कोणतेही काम आपल्याला दिले ते काम आपल्याला करता आले पाहिजे, यासाठी प्रत्येक गोष्टींचे ज्ञान आवश्यक आहे. असेही हर्षल गायकवाड यांनी सांगितले.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. मान्यवरांचे स्वागत जयंत पत्राळे यांनी केले. प्रास्ताविक करताना विभागीय संचालक जयंत पाठक यांनी संस्थेविषयी माहिती दिली. संचालन व आभारप्रदर्शन यशश्री परचुरे यांनी केले.