Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जुलै ०४, २०२२

*मनसेने घेतला इच्छुक उमेदवारांचा आढावा : मनपा निवडणुकीसाठी मनसेची मोर्चेबांधणी



मनसेने घेतला इच्छुक उमेदवारांचा आढावा : मनपा निवडणुकीसाठी मनसेची मोर्चेबांधणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर शहर मनपा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांनी निवडणूक समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये मनसे नेते माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर , प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी, प्रदेश सरचिटणीस डॉ वागिश सारस्वत, प्रदेश उपाध्यक्ष श्री जी. एम. महाले, प्रदेश उपाध्यक्ष श्री आनंद एम्बडवार यांचा समावेश असून आज या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नागपूर मनसे पदाधिकारी यांची आढावा बैठक रविभवन हॉल येथे घेण्यात आली.
मनसेच्या शहर पदाधिकारी यांनी सर्व प्रभागांची आढावा मनसे निवडणूक समितीसमोर सादर केला. यावेळी इच्छुक उमेदवार यांची समितीच्या सदस्यांनी मुलाखत घेतली.
याप्रसंगी मनसे नेते श्री जयप्रकाश बाविस्कर यांनी सांगितले की सत्तेचा खेळ जनता बघत आहे, जनतेची कामे होत नाहीत हे मतदार यांना समजले आहे यामुळे मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांची मनसे हा पर्याय जनता निश्चितपणे निवडेल फक्त तुम्ही प्रामाणिकपणे जनतेची कामे करीत रहा असा सल्ला उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
मनसे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांनी सांगितले की, नागपुरातील विविध प्रभागात अंतर्गत वसाहतीत असलेल्या समस्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी दूर केल्या नाहीत, संपूर्णतः अयशस्वी ठरलेली 24 by 7 पाणी योजना, स्मार्ट सिटीच्या नावाखाली विकासाचा उडालेला फज्जा नागपूरकर जनता बघत आहे.
मनसेने विविध सामाजिक प्रश्नांवर व जनतेच्या समस्यांवर प्रशासनाला जाब विचारला आहे आणि नेहमी विचारणारच. सत्तेची गणिते कधी बदलतील याचा नेम नसतो. नागपुरातील जनतेने मनपाच्या सत्ताधारी पक्षाचा भोंगळ कारभार बघितला आहे. जनता त्रस्त झाली आहे. तुम्ही सर्व जनसंपर्क रहा, जनता नक्कीच आपल्याला स्वीकारेल असा आशावाद व्यक्त केला.
डॉ. वागीश सारस्वत आणि आनंद एम्बडवार यांनी आपल्या खुमासदार शैलीत कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली तर जी एम महाले यांनी मनसेच्या शाखा स्थापनेवर अधिक भर द्या असे सांगितले.
बैठकीचे संचालन शहर अध्यक्ष अजय ढोके यांनी केले. मनसेच्या सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर आभार प्रदर्शन शहर अध्यक्ष विशाल बडगे यांनी केले.
मनसे पदाधिकारी उपशहर अध्यक्ष प्रशांत निकम, शहर सचिव घनश्याम निखडे,शाम पूनियानी, विभाग अध्यक्ष चंदू लाडे, तुषार गिऱ्हे, उमेश बोरकर, उमेश उत्तखेडे, गौरव पुरी, महिला सेनेच्या मनीषा पापडकर, संगीता सोनटक्के, अचला मेसन, कल्पना चव्हाण,विद्यार्थी सेनेचे दिनेश इलमे, दीपक उज्जैनकर, वाहतूक सेनेचे सचिन धोटे, मंगेश शिंदे, जिल्हाध्यक्ष किशोर सरायकर आणि सहकारी यांनी आपला अहवाल समितीपुढे सादर केला.


मनसे नेते जयप्रकाश बाविस्कर, हेमंत गडकरी, डॉ वागिश सारस्वत, जी. एम.महाले, आनंद एम्बडवार यांचे मनसे शहर कार्यकारणी नागपूर तर्फे रविभवन येथील संपन्न आढावा बैठकीत स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शहर अध्यक्ष अजय ढोके आणि विशाल बडगे प्रामुख्याने उपस्थित होते.




 Nagpur municipal corporation election Maharashtra navnirman Sena 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.