मनसे प्रणित मराठी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव सचिन भोयर व चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष नितीन भोयर यांच्या समवेत चंद्रपूर फेरो आलोय प्लांट युनिट
कार्यपालक निदेशक मोरेश्वर झोडे यांच्या कार्यालयात चंद्रपूर फेरो आलोय प्लांट मध्ये कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या संदर्भात बैठक घेण्यात आली.
मागील काही महिन्यापूर्वी कामगारांच्या वतीने 3 दिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर केंद्रीय श्रमायुक्त देवेंद्र राव यांचेकडे चंद्रपूर फेरो आलोय प्लांट अधिकारी व युनियन मध्ये बैठक घेऊन कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या परंतु कंपनी कंत्राटदारांनी अद्याप त्यावर अमलबजावणी केली नाही .त्याबाबत ED साहेबांना सूचित करण्यात आले. येत्या काही दिवसात अमलबजावणी करू असे ED साहेबांनी सांगितले आहे.
कामगारांचे आर्थिक शोषण करणारे अनम कॉन्ट्रॅक्टर, अनिल सूरपाम , अमोल आईंचवार याची तक्रार युनियनच्या वतीने करण्यात आली , शिल्लक जुन्या कामगारांना कामावर घेण्यास सांगितले आदी सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय श्रमायुक्त देवेंद्र राव यांची भेट घेत कामगारांच्या समस्या मांडण्यात आल्या त्याबाबत एक सुचना पत्र केंद्रीय कार्यालयातून पाठविण्यात आले. काल दिवसभर एकूण याप्रमाणे युनियन पदाधिकाऱ्यांनी कामगारांच्या हितार्थ कार्य केले.
@MNS #Chandrapur