अतिवृष्टीमुळे गोंडकालीन चांदा किल्याला भेगा; पडझड होण्याची शक्यता
चंद्रपूर | शहरात असलेल्या गोंडकालीन किल्ल्याला अतिवृष्टीचा फटका बसू लागला आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे आलेल्या पुराचे पाणी गोंडकालीन किल्ल्यांच्या भिंतीपर्यंत पोहोचले. दादमहल येथील किल्ल्याची भिंत खचू लागली असून, केव्हाही पडझळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने बँरिकेट लावले आहेत.
चंद्रपूर शहराला गोंडकालीन इतिहास लाभला आहे. झरपट आणि इरई नदीच्या मधात वसलेल्या चंद्रपूर शहराला गेल्या अनेक वर्षांपासून पुराचा फटका बसत आहे. या पुराच्या पाण्यापासून चंद्रपूर शहराचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने तत्कालीन गोंडराजांनी किल्ल्याची निर्मिती केली. त्यामुळे किल्ल्याचे परकोट पुराचे पाणी अडवित्त आहे. चंद्रपूरचा हा किल्ला शहरातील नागरिकांसाठी पावसाळ्याच्या दृष्टीने संरक्षक भिंतच ठरला आहे. मात्र नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे इराई नदीला पूर आला आणि त्या पुराक्या पाण्याच्या लाटा चंद्रपूरच्या या किल्ल्या भिंतींना आदळू लागल्या. परिणामी परकोटाची भिंत आणि बुरुज देखील ढासळू लागले आहेत. अशातच दादमहल येथील हनुमान खिडकी लगत असलेल्या किल्ल्याची पडझड होत आहे. किल्ल्याची भिंत केव्हाही पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी या भिंतीजवळ जाऊ नये, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेने केले आहे. अतिक्रमण पथक पाठवून पडझड झालेल्या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आलेले आहेत. शिवाय या संदर्भातील माहिती पुरातत्त्व विभागाला दूरध्वनीद्वारे दिल्याचे महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने सांगितले.
चंद्रपूर, महाराष्ट्र, भारत
Chandrapur city history Gondkalin rivers Jharpat and Irai, Chandrapur city from this flood water, the then Gondarajas built the fort.