Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै १६, २०२२

झाड कोसळल्याने घरांचे नुकसान |




झाड कोसळल्याने घरांचे नुकसान  
पिडीत कुटुंबियांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आर्थिक मदत

झाड कोसळल्याने घरांचे नुकसान झाल्याची घटना आज रयतवारी काॅलरी येथे घडली. घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर परिसर गाठत नुकसान झालेल्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना आर्थिक मदत केली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, माजी नगर सेवक राजेश रेवल्लीवार, शंकर दंतुलवार आदिंची उपस्थिती होती.



चंद्रपूरात पावसाचा जोर मंदावला असला तरी या पावसाने अनेकांचे मोठे नुकसान केले आहे. अशा कुटुंबीयांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आर्थिक मदत केल्या जात आहे. दरम्यान आज कडूलिंबाचे झाड कोसळल्याने रयतवारी येथील सुरेश सदनलवार, राजु झंजलवार, शुभम पोतनवार आणि सुरज अडपेवार यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी रयतवारी काॅलरी परिसरात जात सदर नुकसानग्रस्त कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी घटनेची पाहणी करत सदर कुटुंबीयांना आमदार किशोर जोरगेवार यांनी आर्थिक मदत केली आहे. तसेच प्रशासनातर्फेही सदर कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

The incident of house damage due to falling tree happened today at Ryatwari Kallari. On getting information about the incident, MLA Kishore Jorgewar reached the area and met the affected families and helped them financially. On this occasion, Pankaj Gupta, Metropolitan District President of Young Chanda Brigade, former municipal servant Rajesh Revalliwar, Shankar Dantulwar etc. were present.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.