Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै १६, २०२२

रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी कन्हाळगाव अभयारण्यातील घनदाट जंगलात डोग्यांने पुरातून काढला मार्ग | Chandrapur

चंद्रपूर Chandrapur / Gondpimpari

  जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगावला पुराने वेढा दिला. येण्या-जाण्याचे मार्ग बंद झालेत. अश्या बिकट स्थितीत वाघाडे कुटूंबावर संकट कोसळलं. कुटूंबातील साहिल कालिदास वाघाडे या मुलाला मेंदुज्वर झाला. तोहोगाव आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रूग्णाला तात्काळ जिल्हा रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र रूग्णाला न्यायच कसं ? हा मोठा प्रश्न कुटूबाला पडला. कन्हाळगाव अभयारण्यातील घनदाट जंगलातून डोग्यांने पुरातून मार्ग काढला. 



चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव परिसरास अभयारण्य घोषित करण्यात आले. हे महाराष्ट्रातील 50 वे अभयारण्य आहे. कन्हाळगावचे एकूण अभयारण्य क्षेत्र हे 269 चौरस किलोमीटर आहे. गोंडपिंपरी तालुक्यात अनेक गावे यालगत वसली आहेत. 

गावाचे उपसरपंच फिरोज पठाणा यांनी गोंडपिपरीचे तहसिलदार के. डी. मेश्राम यांना भ्रमणध्वनीने संकटाची माहीती दिली. तहसीलदारानी वेळ न घालविता कन्हाळगाव अभयारण्यातील कन्हाळगाव कॅम्प नंबर चार या घनदाट मार्गे रूग्णवाहीका घेऊन धाव घेतली. मात्र या मार्गावर झाड कोसळले होते. त्यामुळं वाहन पुढे जावू शकत नव्हते. अखेर रूग्णवाहीका माघारी फिरली. हे कळताच कुटूबाची धाकधूक वाढली.



आज ( शनिवारला ) पहाटेलाच कोठारी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तुषार चव्हाण यांनी पोलीस जवानांना सोबत घेतले. सोबत वनविकास महामंडळाचे वनकर्मचारी होते. या दोन्ही विभागातील कर्मचाऱ्यांनी मार्गातील कोसळलेले झाड हटविले. अन मार्ग मोकळा केला. तिकडे मार्ग मोकळा झाल्याची माहीती मिळताच कुटूंबाना आनंद झाला. कोठारी ठाणेदार चव्हाण यांनी डोग्यांने गाव गाठले आणि रूग्णाला घेऊन चार नंबर मार्ग गाठला. इकडे तहसिलदार के.डी.मेश्राम यांनी रूग्णवाहीकेने घटनास्थळ गाठले. रूग्णाला जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तालुका प्रशासनाचा या धाडसी कामगीरीचे कौतुक होत आहे.


Kanhalgaon area of Chandrapur district was declared a sanctuary. This is the 50th sanctuary in Maharashtra. The total sanctuary area of Kanhalgaon is 269 square kilometers. In Gondpimpri taluka many villages are situated along it.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.