नवेगावबांध दि.३० एप्रिल:-
येथील आरुषी पब्लिक स्कूल येथे 25 एप्रिल पासून सुरु असलेल्या उन्हाळी शिबिराचा समारोप आज (दि.३० एप्रिल) रोज शनिवार ला आनंद मेळावा व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करून संपन्न झाला.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमल गोविंद युनायटेड वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा वैशाली बोरकर ह्या होत्या. तर पाहुणे म्हणून सचिव एकनाथ बोरकर,डॉ. बाळू कापगते, मुख्याध्यापक किशोर शंभरकर, धकाते,परशुरामकर, विजय डोये, रामदास बोरकर, नवल चांडक, खुषाल कापगते,नीता जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रारंभी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,विद्येची देवता शारदा माता यांच्या प्रतिमांना दीप प्रज्वलित करुन व पुष्पहार अर्पण करुन अतिथींच्या हस्ते त्यांना अभिवादन करण्यात आले. खास विद्यार्थी,शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उन्हाळी शिबिरात योगा, संगीत, नृत्य, गायन, हार्मोनियम-तबला वादन, इंग्रजी भाषेतील संवाद याचे प्रशिक्षण देऊन, विद्यार्थ्यांसाठी चमचा गोळी, संगीत खुर्ची या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा समारोप आनंद मेळाव्याने झाला. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून,मेळाव्याची रंगत वाढवली. उपस्थित पालकांनी व मान्यवरांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवन कार्याविषयी मार्गदर्शन केले.
समारोपाला विद्यार्थी,शिक्षक,पालक, निमंत्रितांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवली होती.
कार्यक्रमाचे संचालन अमित बोरकर यांनी केले.तर उपस्थितांचे आभार टि. एल. मेश्राम यांनी मानले.
शिबिर,मेळावा,समारोप यशस्वी करण्यासाठी शिक्षक डी.एन.शहारे, प्रवीण तिरपुडे,प्रशांत शहारे, महेश लंजे, गौतम शेंडे, काशिनाथ सराटे, अर्चना पवार, सीमा राऊत,हर्षा डोये, निर्मला सराटे,रीना ब्राह्मणकर, निशिगंधा सोनवाने, शिक्षकेतर कर्मचारी विठ्ठल जुगनाके, अनिल गायकवाड, दीपक जुगनाके, लीलाधर वलके,कैलास कोवे, देवांगणाबाई यांनी सहकार्य केले.