Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल ३०, २०२२

जिल्हा बँक प्रकरणी उच्च न्यायालयाकडून दखल

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रशासक नियुक्ती प्रकरणी मा. उच्च न्यालयालयाकडून दखल






सर्वांचे लक्ष लागून असणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही 2017 पासून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्या कारणाने प्रलंबित आहे. सदर बँकेची शेवटची निवडणूक ही 2012 साली घेण्यात आली होती या निवडणुकीनंतर कार्यरत संचालक मंडळाची मुदत ही 2017 साली संपुष्टात आली मात्र राज्यघटनेतील 97 घटनादुरुस्तीला आव्हान देणारी याचिका मुंबई खंडपीठात प्रलंबित असून सदर संचालक मंडळाने बँकेची उपविधी मध्ये दुरुस्ती केल्याने प्रतिनिधित्व नाकरण्याने नाराज होऊन मुंबई खंडपिठात याचिका दाखल करण्यात याली होती. सदर याचिकेवर सुनावणी करताना मा. न्यायालयाने आपल्या 21.07.2017 च्या आदेशान्वये निवडणुकीला स्थगिती दिली होती. तेव्हापासून 2012 कार्यरत असणारे संचालक मंडळ कारभार पाहत आहे. सध्या मंत्री विजय वडेट्टीवर गटाचे संतोषसिंग रावत हे अध्यक्ष आहेत.


सन 2017 पासून मुदत संपल्यावरही कार्यरत असणाऱ्या संचालक मंडळावर अनेकदा अनिमियतेचे व गैरवर्तुनिकीचे आरोप झालेले आहेत त्याप्रकरणी बँकेचे माजी संचालक श्री. वसंतराव विधाते आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुधाकर अर्जुनकर यांनी वारंवार सहकार आयुक्त, पुणे, विभागीय सहनिबंधक सहकार, नागपूर यांचेकडे तसेच RBI & नाबार्ड यांचेकडे पत्रव्यवहार केला आणि वर्तमान संचालक मंडळाकडून केली जाणारी अनिमियतात लक्षात आणून दिली आणि सदर संचालक मंडळ बरखास्त करून त्या जागी प्रशासक नियुक्तीची मागणी केली. सदर प्रकरणी उल्लेखनीय बाब म्हबाजे चंद्रपूर जिल्हा खासदार श्री. बालू धानोरकर यांनी देखील संबंधित प्रकणात सहकार विभाग आणि मंत्रालयात पत्रव्यवहार केला आहे.


संबंधित प्रकरणी कुठलाही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने मा. वसंतराव विधाते आणि सुधाकर अर्जुनकर यांनी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात याचिका क्रं.2126/2022 दाखल केली असून मुदत संपलेले संचालक मंडळ बरखास्त करून त्याजागी प्रशासकाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. संबंधित याचिकेत याचिकार्त्याचे वतीने अमरावती जिल्हा सहकारी बँक आणि यवतमाळ जिल्हा सहकारी बँक प्रकरणात सर्वाच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा हवाला देण्यात आला. सदर याचिकेची दखल घेत न्यायमूर्ती श्री नितीन जामदार व श्री. पानसरे यांनी संबंधीत पक्षकारांना नोटीस बजावली असून पुढील सुनावणी 8 जूनला ठेवण्यात आली आहे. *याचिकाकर्त्यांचे वतीने जेष्ठ विधिद्य श्री.श्रीरंग भंडारकर व ॲड गणेश मते यांनी युक्तिवाद केला.



district Central cooperative Bank Chandrapur High court Nagpur

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.