*महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर तर्फे येणाऱ्या महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुका २०२२च्या अनुषंगाने निवडणूक लढविण्यास इच्छुक पात्र उमेदवारांसाठी उमेदवारी अर्ज दिनांक १० मार्च पासून उपलब्ध झाले आहे.
इच्छुक उमेदवारांना हे प्राथमिक उमेदवारी अर्ज मनसे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांच्या धरमपेठ कार्यालयात *सकाळी ११ ते १ पर्यंत* मिळणार असून आज पहिल्याच दिवशी इच्छुकांनी उमेदवारी साठी आपले नामांकन मनसे कार्यालय दाखल केले.
*प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी* यांच्या मार्गदर्शनात *शहर अध्यक्ष श्री अजय ढोके* यांच्या प्रमुख उपस्थितीत आज *दक्षिण - पश्चिम विधानसभा विभाग अध्यक्ष श्री तुषार गिऱ्हे व प्रभाग ४२ आणि प्रभाग ५२ मधील इच्छुक उमेदवार श्री चेतन शिराळकर, श्री शिरीष पटवर्धन, श्री उत्तम रागीट, श्री साहिल बेहरे, श्री रोशन इंगळे, सौ प्रिया बोरकुटे, सौ नेहा शर्मा यांनी तसेच प्रभाग १२ मध्य नागपूर येथील श्री रजनी पंकज खिंची यांनी उमेदवारी अर्ज घेतला.*
*मनसे तर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांनी मनसे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत शहर सचिव श्री शाम पूनियानी व श्री घनश्याम निखाडे यांचेशी संपर्क साधावा असे शहर अध्यक्ष अजय ढोके व विशाल बडगे यांनी सांगितले आहे.
*नागपुरात प्रत्येक प्रभागात मनसेने चाचपणी सुरू केली असून मनसे पदाधिकारी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. येणाऱ्या निवडणुकीचा कालावधी जरी पुढे गेला असला तरी मनसेची रणनीती तयार असून यंदा लढायचे ते जिंकण्यासाठी याकरिता सर्व मनसैनिक सज्ज आहेत असे प्रतिपादन प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांनी केले आहे.
*याप्रसंगी प्रामुख्याने शहर अध्यक्ष श्री अजय ढोके, शहर उपाध्यक्ष श्री रजनीकांत जिचकार, शहर सचिव श्री शाम पूनियानी, शहर सचिव श्री घनश्याम निखाडे, विभाग अध्यक्ष श्री तुषार गिऱ्हे, प्रभाग अध्यक्ष श्री राजेश शर्मा,अरविंद बावणे यांचेसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
MNS Nagpur starts receiving preliminary candidature applications for aspiring candidates: Good response from aspirants on the first day