*दिनांक ९ मार्च २०२२* रोजी *महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सोळावा वर्धापन दिन नागपूर येथे मनसे दक्षिण - पश्चिम विभागातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
*महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. हेमंत गडकरी व शहर अध्यक्ष श्री अजय ढोके* यांच्या मार्गदर्शनाखाली *विभाग अध्यक्ष श्री तुषार गिऱ्हे* यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
छत्रपती नगर येथील मनसे जनसंपर्क कार्यालय समोर सायंकाळी सात वाजता आयोजित या कार्यक्रमात दक्षिण-पश्चिम विभागातील सर्व मान्यवर पदाधिकारी, मनसैनिक व परिसरातील नागरिक यांनी सहभाग घेतला.
*कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले शहर अध्यक्ष श्री अजय ढोके, शहर उपाध्यक्ष श्री रजनीकांत जिचकार, वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक श्री सचिन धोटे,.महिला सेनेच्या शहर अध्यक्षा सौ संगीता सोनटक्के, यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मनसे वर्धापन दिनाचा केक कापून उपस्थित पदाधिकारी व नागरिक यांना मनसेच्या वर्धापदिनानिमित्त शुभेच्छा बहाल केल्या.
शहर अध्यक्ष श्री अजय ढोके यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, मा. राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात सोळ्या वर्षाच्या वाटचालीत पक्षाने अनेक खडतर आव्हाने स्वीकारली व यशस्वी सुध्दा करून दाखवली. महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी आणि स्थानिक भूमीपुत्रांच्या हक्कासाठी मनसैनिक नेहमी लढला आहे व पुढेही लढत राहील. येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीत परत एकदा जनतेच्या आशीर्वादाने मनसेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सभागृहात दिसतील त्यामुळे जिद्दीने आणि प्रामाणिकपणे जनतेची कामे करीत रहा, आपला विजय निश्चित आहे असा विश्वास व्यक्त केला आणि कार्यक्रमाचे आयोजन करणारे विभाग अध्यक्ष श्री तुषार गिऱ्हे यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी *श्री राजसाहेब ठाकरे* यांच्या विचारांनी प्रेरित होऊन काही युवकांनी मनसेत प्रवेश घेतला.
सर्व मान्यवरांचे मनोगत झाल्यानंतर भव्य प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर परिसरातील नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात मिठाई व महाप्रसाद वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन पदाधिकारी श्री संजय करमचंदानी यांनी केले.
आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी *सर्वश्री विभाग उपाध्यक्ष चेतन शिराळकर, विभाग उपाध्यक्ष श्री चेतन बोरकुटे, महिला विभाग उपाध्यक्ष सौ प्रिया बोरकुटे, प्रभाग अध्यक्ष श्री राजेश शर्मा, प्रभाग उपाध्यक्ष राजकिशोर चंद्रवंशी, महिला शाखा अध्यक्षा पिंकी शर्मा आणि सर्वश्री शाखा अध्यक्ष अक्षय दहीकर, समशेर अंसारी, सुधीर पळसखेडकर,शिरीष पटवर्धन, राजूभाऊ पोलाखरे, देवेंद्र ठाकरे, उत्तम रागीट, साहिल बेहरे, यांनी परिश्रम घेतले.*
यावेळी परिसरातील नागरिक आणि अन्य पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
MNS celebrates 16th anniversary with enthusiasm: Fireworks and distribution of Mahaprasada in Nagpur