Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च १४, २०२२

जुन्नरमधील बिबट सफारी पार्क स्थलांतरास विरोध माजी आमदार शरद सोनवणे करणार आमरण उपोषण




जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यातील आंबे गव्हाण येथे प्रस्तावित असलेल्या बिबट्या सफारी पार्क हा प्रकल्प बारामती तालुक्यात नेण्याचा घाट घातला जात असून यासाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा माजी आमदार शरद सोनवणे यांनी दिला आहे.    अर्थसंकल्पात  पुणे वन विभागाअंतर्गत   बारामती तालुक्यात बिबट्या सफारी  पार्क साठी साठी  निधीची  घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी  केली .त्यानंतर   आंबे गव्हाण  येथील प्रकल्पा संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित नागरिकांत संतापाचे 
वातावरण निर्माण झाले होते.  यासंदर्भात शिवसेनेची भुमिका  मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शरद सोनवणे बोलत होते.  शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे,जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे , नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, संतोष घोटने, विकास रावते,अभय वाव्हळ यावेळी उपस्थित होते.       


          
 शरद सोनवणे पुढे म्हणाले ,  २०१७मध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ,पालक मंत्री गिरीश बापट ,याचे बरोबर झालेल्या बैठकीत ठरले प्रमाणे वन विभाग सचिव विकास खरगे यांनी आंबे गव्हाण येथे पाहणी केली.प्रकल्पाला मंजुरी मिळालेनंतर  सर्वक्षणासाठी तसेच डीएसआर साठी निधी द्यावी असे पत्र त्यांनी दिले  होते..परंतु विद्यमान  आमदार अतुल बेनके यांनी नंतर कोणतही पाठपुरावा केला नाही. हे स्वतःचे अपयश झाकण्यासाठी   ते 
खोटे आरोप करत आहे.                


   हा  उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्याशी बोलताना तुमची अडचण होत असेल तर आम्ही यासाठी भांडु. हा तालुक्याच्या  अस्मितेचा प्रश्न आहे.जुन्नर तालुक्यातील ऊस शेती बिबट्याचे निसर्गाच्या  नैसर्गिक अधिवास आहे .ज्याठिकाणी बिबट्या समस्या आहे आणि सफारीसाठी पोषक वातावरण आहे. अशा जुन्नर तालुक्यातच  सफारी होणे आवश्‍यक आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे 
 पाठपुरावा करणार असल्याचे सोनवणे म्हणाले.


Former MLA Sharad Sonawane will go on a hunger strike to protest against the relocation of Bibat Safari Park in Junnar

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.