Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च १४, २०२२

मनरेगा अंतर्गत 40 टक्के कुशल कामाकरिता मुरूम उपलब्ध करून देण्याची श्रमिक एल्गार ची मागणी



मनरेगा अंतर्गत २०२१- २०२२ मध्ये ४० टक्के कुशल स्वरूपाची कामे करण्यासाठी मुरूम उपलब्ध करून देण्याची मागणी श्रमिक एल्गारच्या वतीने आज 14 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे खनिकर्म विभागातील अधिकाऱ्यांना दिले निवेदनातून केली.

जिल्हा कार्यक्रम समन्वयक मग्रारोहयो, जिल्हा परिषद , चंद्रपूर यांचे ३१ / ०१ / २०२२ च्या पत्राच्या अनुषंगाने मनरेगा अंतर्गत सन २०२१-२०२२ चे एकूण मनुष्य दिवसाचे ४० टक्के निधी कुशल स्वरूपाच्या कामावर खर्च करण्यासाठी तरतूद केली आहे. त्यानुसार कुशल स्वरूपाच्या कामामधून कायम स्वरूपाची मत्ता निर्माण होतात , ज्यामुळे वैयक्तिक व गाव विकास साध्य करण्यास मदत होते. ४० टक्के कुशल स्वरूपाच्या कामाचे नियोजन करून कामे १५ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करून संकेतस्थळावर MIS करावे, असेही सूचित करण्यात आले होते.

पोंभूर्णा तालुक्यातील जवळपास ४४ गावाचे काम अडकले आहेत. हे सर्व काम पांदन रस्त्याशी व शेतकऱ्यायाशी संबंधित आहेत. काम प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. शेतीचे पुढील हंगामाची कामे सुरु होण्याआधी या समस्येकडे लक्ष देण्यात यावे व पांदन रस्त्याचे कामे लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी श्रमिक एल्गारने केली आहे. यावेळी श्रमिक एल्गारचे अध्यक्ष प्रवीण चीचघरे, महासचिव अड. कल्याण कुमार, घनश्याम मेश्राम यांच्यासह कार्यकत्यांची उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.