Statement of Nagpur MNS to Water Supply Department: Take away the water problem of the citizens
*दक्षिण - पश्चिम मतदार संघ, नागपूर* येथील वर्धा रोड स्थित नाव निर्देशित प्रभाग ५२ चिंचभवन परिसरातील वैशालीनगर, राजाराम नगर या वसाहतींमध्ये मनपा द्वारे पिण्याचे पाणी मिळत नसून येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. शहरातील या प्रभागात अनेक समस्या आहेत, मुख्य म्हणजे पिण्याचे पाणी नीट मिळत नसल्यामुळे येथील जनता त्रस्त आहे. मनसे पदाधिकारी यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व याविषयी *जलप्रदाय कार्यकारी अभियंता मनपा नागपुर श्री श्रीकांत वाईकर* यांची शहर अध्यक्ष अजय ढोके व सहकारी पदाधिकारी यांनी भेट घेतली व ही समस्या तत्काळ दूर करण्यासंबंधी चर्चा केली. यावेळी मनसे शिष्टमंडळाने सांगितले की, *वैशालीनगर वसाहतीत* मनपाचा पाणी पुरवठा अतिशय अल्प प्रमाणात येतो त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. पाण्याचे बिल सुध्दा येथील नागरिक वेळोवेळी भरतात पण दैनंदिन जीवनात आवश्यक असलेला पाणी पुरवठा मात्र मनपाकडून होत नाही.
*राजारामनगर वसाहतीत* तर अजूनही नळाचे कनेक्शन लोकांना मिळाले नाही. या परिसरातील पाण्याच्या हाफशी सुध्दा निकामी झाल्या आहेत, याची पाहणी करून या हाफशी दुरुस्त कराव्या अथवा नवीन लावण्यात याव्या अशी मागणी केली.
कार्यकारी अभियंता श्री वाईकर यांनी समस्येची दखल घेऊन *ओसीडब्लू संबंधित अधिकारी श्रीमती नीलम वर्मा* यांना दालनात बोलावून समस्येवर तोडगा काढण्यासाठी सूचना दिल्यात व या आठवड्यातच या प्रश्नाचे समाधान करू असे आश्वासन मनसे शिष्टमंडळाला दिले.
*याप्रसंगी मनसे शहर अध्यक्ष अजय ढोके, शहर उपाध्यक्ष रजनीकांत जिचकार, विभाग अध्यक्ष तुषार गिऱ्हे, विभाग उपाध्यक्ष चेतन शिराळकर, विभाग उपाध्यक्ष चेतन बोरकुटे प्रामुख्याने मनसे शिष्टमंडळात उपस्थित होते.*
पाणी प्रश्नी मनसेने लगेच दखल घेतली म्हणून वैशाली नगर परिसरातील सर्वश्री राजू सोनकुसरे, अमर कांबळे, मंगेश वाघाडे, महेश डोंगरवार, राजेश यादव व इतर नागरिक यांनी मनसे पदाधिकारी यांचे आभार मानले.