आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली दूध संकलन केंद्रासाठी मदर डेअरी अधिकाऱ्यांशी प्रदीर्घ चर्चा
चंद्रपूर जिल्ह्यातील अजयपुर, गोवर्धन येथील मदर डेअरी अंतर्गत सुरु असलेले दूध संकलन केंद्र पूर्ववत सुरू व्हावे तसेच दूध उत्पादनात जिल्ह्यांतील शेतकरी सक्षम व्हावा यासाठी लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज 17 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय दुध विकास प्राधिकरण आणि मदर डेअरीच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती देखील या माध्यमातून शेतकऱ्यांना देता येईल अशी संकल्पना श्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीत मांडली.
चंद्रपूर जिल्ह्यातील दूध संकलन वाढावे, शेतकऱ्यांचा आत्मविश्र्वास वाढवा यासाठी मदर डेअरी ने आवश्यक पावले उचलावीत अशी सूचना त्यांनी केली. एन डी बी चे विदर्भ मराठवाडा विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक डॉ.व्हीं. श्रीधर यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दूध संकलन सक्रीय करण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन या आढावा बैठकीत दिले. यावेळी मदर डेअरी चे डॉ. मुकेशकुमार झा, डॉ समीर मुधुली आदी अधिकारी उपस्थित होते.