Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी १७, २०२२

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे निराधार व युवकांचे प्रश्न सोडवणार : मा. रमेश बंग



-
"निराधार व युवकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी मी सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहे" अशी भावप्रधान भावना माजी मंत्री मा. रमेश बंग यांनी व्यक्त केली. ते प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल ह्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शांती विद्या भवन, डिगडोह, हिंगणा रोड, नागपूर येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने बोलत होते. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते व अनिल अहिरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. खा. प्रफुल्ल पटेल ह्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून गरजूंना ब्लॅंकेट वितरण व गरजू विद्यार्थ्यांना नोटबुक व फळ वाटपाचा कार्यक्रम मा. माजी मंत्री रमेशचंद्रजी बंग माजी केंद्रीय मंत्री श्री. सुबोधजी मोहिते यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाला प्रदेश उपाध्यक्ष अनिलजी अहीरकर तसेच जि. प. सदस्या रश्मीताई कोटगुले प्रामुख्याने उपस्थित होत्या. हा कार्यक्रम मा. सुनीलजी रायसोनी, मा. विकासजी पिंचा तसेच उद्योगपती मा. दिनेशजी केजरीवाल ह्यांच्या सौजन्याने व सहकार्याने आयोजन करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजक दिलीप पनकुले, प्रदीपजी कोटगुले, विजय कोटगुले व फैजल शेख यांनी केले असून याप्रसंगी शिवसेनेचे अभिजित शेंडे, नितीन रडके, योगेश मोहुर्ले, ललित चौधरी, आशिष फरकाडे, धीरज शेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाला अंकित कोल्हे, शशीकर चतुर्वेदी, श्रीधर मसराम, अंजली कोटगुले व गावकरी मंडळी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होती.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्री. संजय शेवाळे यांनी केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.