Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी १७, २०२२

सिमेंट रोड मध्ये आलेले विजेचे पोल बनले मृत्यूचा सापळा: मनसेचे पोल हटाव आंदोलन






नागपुर शहरात विकासाच्या नावाखाली रस्ते मोठे करून सिमेंट रोड बांधले पण या रुंदीकरणात रोडच्या मधोमध आलेले विजेचे खांब अपघाताचे स्थळ बनले असून प्रशासनाच्या ढिम्म कारभाराबाबत नागपूर मनसे आक्रमक झाली असून याविरोधात पश्चिम नागपुरातील मनसे पदाधिकारी यांनी *" पोल हटाव आंदोलन"* केले.
झिंगाबाई टाकळी ते गोदनी सिमेंट रोड चे बांधकाम पूर्ण झाले असले तरी वाहतुकीस अडथळा होणारे जीवघेणे विजेचे पोल आजही रस्त्याच्या मध्यभागी आहेत. अनेक निवेदने संबंधित विभागाला देऊनही याबाबत काहीच कारवाई न झाल्याने मनसेने झींगाबाई टाकळी येथील मैदानात पोल हटाव आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढत प्रशासना विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.
मनसे शहर अध्यक्ष श्री अजय ढोके यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम विभाग अध्यक्ष श्री चंदू लाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन उभारण्यात आले.
मनसेने सार्वजनिक बांधकाम विभागावर आरोप करीत म्हटले की, संबंधित अधिकारी व कंत्राटदार कंपनी यांनी जनतेची सोय करण्यापेक्षा स्वतःच्या आर्थिक फायद्यावर जास्त लक्ष देऊन मोकळ्या वाहतुकीसाठी अति आवश्यक असलेले कामे दुर्लक्षित केली. मृत्यूचे अपघात स्थळ बनलेले हे विजेचे पोल हटविण्याची अनेक अपघात होऊनही यांनी तसदी घेतली नाही, यासंबंधी हे काम प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध सरकारने कारवाई करावी आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हे पोल किती दिवसात हटविता ? असे विचारत लेखी आश्वासन हवे अशी मागणी केली.
शहर अध्यक्ष अजय ढोके व विभाग अध्यक्ष चंदू लाडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री जनार्दन भानुसे यांच्याशी फोनवरून चर्चा करून संबंधित अधिकारी यांना आंदोलन स्थळी लेखी आश्वासनची प्रत घेऊन पाठवा अन्यथा आंदोलन सुरू राहील असे सांगितले. या आंदोलनावेळी उपस्थित असलेले मानकापूर पोलिस स्टेशनचे अधिकारी यांनीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गासोबत चर्चा केली. आंदोलन स्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हजर होऊन त्यांनी येत्या तीन महिन्यात वाहतुकीस अडथळा होणारे विजेचे पोल हटविण्यात येतील असे लेखी आश्वासन मनसेला दिले यावर दिलेल्या वेळेत कामे पूर्ण करा अन्यथा यापुढे उग्र आंदोलन करू असा इशारा देत मनसेने आंदोलन मागे घेतले.


मनसेच्या पोल हटाव आंदोलनाचे आयोजन पश्चिम विभाग उपाध्यक्ष सर्वश्री पराग विरखरे, नितीन वानखेडे, जगदीश इंगोले, जितेंद्र चांभारे यांनी केले.

या आंदोलनात शहर अध्यक्ष अजय ढोके, शहर उपाध्यक्ष रजनीकांत जिचकार, विभाग अध्यक्ष चंदू लाडे यांचेसह प्रमोद राऊत, अभिषेक डे, अभिषेक माहुरे, शुभम चौधरी, प्रशांत राजूरकर, रजत मोहोड, अक्षय रायपूरे, राजू सोनवणे, रोशन पानुरकर, कैलाश साहू, जयदेव आमले, स्वप्नील कटरे, नंदू बाजनघाटे, चेतन रायपूरे, प्रणय आमले, निलेश शिवस्कर, तुषार गावंडे, प्रवीण देशमुख, ओम उगले, चिराग पुसदकर, नीरज राऊत, पियूष चौधरी, ओम मिसाळ, प्रज्वल घोडमारे, तुषार कुहिटे, संदीप गाडीगोणे, सुमित माने, यांचेसह अनेक महाराष्ट्र सैनिकांनी सहभाग घेतला.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.