• नागपूर आणि वर्धा येथील महाविद्यालयांचा सहभाग
नागपूर | टॅली इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग, नागपूर येथे नुकत्याच पहिल्या टॅली कॅम्पस “अॅाम्बेसेडर मीट” चे आयोजन करण्यात आले. टॅली कंपनी आणि नागपूर स्थित सॉफ्टसेन्स टेक्नोसर्व्ह (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने या क्षेत्रातील आघाडीच्या वाणिज्य महाविद्यालयांमध्ये "टॅली कॅम्पस अॅम्बेसेडर" नियुक्त केले आहेत. हे अॅम्बेसेडर्स शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यात सेतू म्हणून काम करतील. भारतभरातील जवळपास सर्व वाणिज्य आणि व्यवस्थापन संस्थांमध्ये टॅली शिकण्याचे वाढते महत्त्व पाहून हा पुढाकार घेण्यात आला आहे.
सुरुवातीला नागपूर आणि वर्धा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्चे रीवा बावनगडे, शैलेंद्र सिंग; डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे अथर्व मेश्राम, आदिती भार्गव; कमला नेहरू महाविद्यालयाचे विनय पवार, नंदीनी घुले; भिवापूर महाविद्यालयचे दिलीप बोकाडे, मयुरी कलारकर; वर्धा येथील जीएस कॉलेज ऑफ कॉमर्सचे मधुर चंदोरिया, सार्थक कालोकर; आणि न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, वर्धाचे राणी मालीये, दिशा महाजन टॅली कॅम्पस अॅम्बेसेडर असतील.
या बैठकीत टीआयएलच्या संचालक (शैक्षणिक) अश्विनी लिचडे यांनी सॉफ्टसेन्सच्या २१ वर्षांच्या प्रवासाविषयी माहिती दिली आणि सेंटर हेड मेरी जोसेफ यांनी वाणिज्य आणि व्यवस्थापन संस्थांमध्ये टॅलीच्या महत्त्वाविषयी सांगितले. टॅलीचे प्रादेशिक व्यवस्थापक – श्री समीर तगारे (पुणे) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे टॅली कंपनी आणि संधींविषयी माहिती दिली.
सॉफ्टसेन्स टेक्नोसर्व्ह (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड ही टॅली कंपनीची विदर्भ प्रदेशातील अधिकृत "टॅली इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग" (TIL) संस्था आहे. व्यवस्थापकीय संचालक, डॉ. विशाल लिचडे यांनी टॅली कॅम्पस अॅम्बेसेडरची संकल्पना आणि महाविद्यालयातील प्रकल्पाची अंमलबजावणी विशद केली, तर प्रकल्प समन्वयक शुभम तभान यांनी बैठक व्यवस्था केली. टॅली इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंगने या शैक्षणिक वर्षात 15 महाविद्यालयांपर्यंत असोसिएशन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.